ठाणे.. काल, आज, उद्या

ठाणे स्थानिक प्रशासन व्यवस्थेची दीड शतकोत्तर वाटचाल भारतात इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर यथावकाश येथे ब्रिटिश पद्धतीची प्रशासन व्यवस्था लागू झाली.

tv11

tv12
ठाणे स्थानिक प्रशासन व्यवस्थेची दीड शतकोत्तर वाटचाल  
भारतात इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर यथावकाश येथे ब्रिटिश पद्धतीची प्रशासन व्यवस्था लागू झाली. त्यावेळी सुरुवातीच्या काळात स्थापन झालेल्या नगरपालिकांमध्ये ठाण्याचा समावेश होता. १८६३मध्ये ठाणे नगरपालिकेची स्थापना झाली. जुन्या बाजारपेठेत पालिकेचे कार्यालय होते. म्हणजेच ठाणे पालिकेला तब्बल १५२ वर्षांचा इतिहास आहे. पुढे २ ऑक्टोबर १९८२ मध्ये ठाण्यालगतचे कळवा, मुंब्रा, दिवा तसेच परिसरातील काही गावे मिळून महापालिकेची स्थापना झाली. सध्या पाचपाखाडी विभागात कचराळी तलावालगत महापालिकेचे नवे सुसज्ज कार्यालय आहे.  ठाणे शहरंची लोकसंख्या एव्हाना २० लाखांच्या घरात पोहचली आहे. प्रत्येक पाच वर्षांनंतर प्रभागांची नवी रचना होते आणि नगरसेवकांची संख्या वाढू लागली आहे. पाचपाखाडी भागात अतिशय गर्दीच्या भागात मुख्यालयाची नवी इमारत उभी असली तरी या इमारतीचा विस्तार आता काळाची गरज बनली आहे. एखादी मोठी सभा भरते तेव्हा मुख्यालयाबाहेरील मुख्य रस्त्यांवर वाहनांची रांग लागते. त्यामुळे शहराचा मध्यवर्ती भागात वाहतूकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसते. शहराचे नियोजन कसे तोकडे आहे याचे हे मुख्यालय म्हणजे द्योतकच म्हणावे लागेल. मुख्यालयात असलेले वाहनतळ कमी पडू लागले आहे. महत्वाच्या अधिकाऱ्यांची वाहने उभी करण्यासही येथे पुरेशी जागा नाही. त्यामुळे ठाणे शहराप्रमाणे पाचपाखाडी येथील महापालिकेच्या नव्या मुख्यालयानेही कात टाकण्याची आता गरज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane yesterday today tomorrow