ठाणे : महापालिका क्षेत्रात करोना तसेच साथ रोग नियंत्रणासाठी पालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या असून त्याचबरोबर ठाणेकरांना पावसाळयात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठविलेल्या किंवा साचलेल्या पाण्यात, धुणी-भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम्स, घराच्या आसपास पडलेल्या नारळयाच्या करवंटया, वाहनांचे टायर्स, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौद, हवाबंद झाकण नसलेल्या सोसायट्याची टाकी यामध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरिन वापरावे, इमारतीमधील व घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, शिळे, उघडयावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत, साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, सात दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेऊ नये, साठविलेल्या पाण्याच्या ड्रम्सवर घट्ट झाकण बसवावे, सोसायटीच्या आवारात, मोकळ्या जागेत, टेरेसवर किंवा घराभोवती नारळाच्या करवंटया, वाहनांचे टायर्स, रिकामे डबे असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच सेप्टीक टँक त्वरीत दुरुस्त करुन घेवून सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवावा.

पावसाळयाच्या दिवसात ताप किंवा इतर कोणत्याही आजाराची लागण झाल्यास लगेचच जवळच्या महापालिका रुग्णालयात, आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी तसेच स्वतःच्या घरातील किंवा आजुबाजूची व्यक्ती हिवताप, डेंग्यू फिव्हर, कावीळ, हगवण, विषमज्वर (टायफॉईड), लेप्टोस्पायरोसिस या साथीच्या रोगांनी आजरी झाल्याचे निदर्शनास आले तर त्याची माहिती त्वरीत जवळच्या महापालिका दवाखान्यात, आरोग्य केंद्रे किंवा आरोग्य विभाग मुख्य कार्यालयात देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

पावसाळ्यात नागरिकांनी घ्यावयाची काळजी

१.पाणी गाळून व १० मिनिटे उकळुन प्यावे.

२.पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरिन ( गोळया / द्रावण ) वापरावे.

३.आपल्या इमारतीमधील गच्चीवरील व जमिनीवरील टाकी तसेच घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करून घ्याव्यात. तसेच त्या टाक्यांची झाकणे जाळीने अच्छादित करावेत.

४. हात स्वच्छ धुतल्याशिवाय काही खाऊ नये .

५. शिळे तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत.

६. उघड्यावर शौचास बसु नये.

७. जुलाब झाल्यास ओ.आर.एस. पाकिटे आरोग्य केंद्रांतून मोफत घ्यावीत.

८. लेप्टोस्पायरोसीस आजार दुषित पाण्यामुळे होऊ नये याकरीता साचलेल्या पाण्यातुन चालणे टाळावे, पायाला जखम असल्यास साठलेल्या पाण्यातून चालत जाऊ नये, साचलेल्या पाण्यातून चालताना अनवाणी न चालता गमबुटाचा वापर करावा तसेच उंदरांमुळे लेप्टोपायरॉसिसचा अधिक प्रसार होतो याबाबत काळजी घ्यावी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thanekars take care health rainy season municipal commissioner appeals citizens amy
First published on: 17-06-2022 at 17:35 IST