ठाणे शहरात गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झालेला असतानाच, याच मुद्द्यावरून ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी पालिकेचे तत्कालीन आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सहाय्यक आयुक्त कळव्यातील एका बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याच्या तयारीत असताना हे बांधकाम पाडू नका असे आदेश शर्मा यांनी त्या सहाय्यक आयुक्तांना दिले होते, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला असून संंबंधित सहाय्यक आयुक्तांनी लेखी खुलाशामध्ये तसा उल्लेख केला असल्यामुळेच सर्वच सहाय्यक आयुक्तांची विभागीय चौकशी प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, ठाणे महापालिका प्रशासनाने आरोप फेटाळून लावत सहाय्यक आयुक्तांच्या विभागीय चौकशी सुरुच असल्याचे स्पष्ट केले आहे. तर, तत्कालीन आयुक्त शर्मा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा- ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानालगतच्या इमारतीतील १३ वर्षीय मुलीची आत्महत्या

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

करोना काळात भुमाफियांनी शहरात बेकायदा बांधकामे उभारली होती. या बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टीका होत होती. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही बेकायदा बांधकामांचा मुद्दा गाजला होता. त्यावेळेस सर्वपक्षीय नगरसेवकांनी एक ठराव केला होता. गेल्या आठ ते दहा वर्षात ज्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यकाळात बेकायदा बांधकामे झाली आहेत, त्या आजी-माजी सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्यासंबंधीचा हा ठराव होता. त्यानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभागाने १४ आजी-माजी सहाय्यक आयुक्तांना नोटीसा बजावून त्यांना बेकायदा बांधकामांबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. त्यास काहींनी स्पष्टीकरण दिले होते तर, काहींनी स्पष्टीकरण दिले नव्हते. या कारवाईबाबतचा अहवाल आयुक्तांकडे पाठविला जाणार होता. परंतु हा अहवाल गुलदस्त्यात असल्यामुळे तसेच पुढे काहीच कारवाई होत नसल्यामुळे पालिकेच्या कारवाईवर टिका होत होती. असे असतानाच, याप्रकरणी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी गंभीर आरोप केला आहे. विभागीय चौकशीदरम्यान तत्कालीन सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी लेखी खुलासा दिला होता. त्यात त्यांनी कळव्यातील एका बेकायदा बांधकामावरील कारवाई थांबविण्याचे आदेश आयुक्त शर्मा यांनी दिले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच सर्वच सहाय्यक आयुक्तांची विभागीय चौकशी प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. सहाय्यक आयुक्तांच्या चौकशी झाल्या तर, अनेक प्रकरणे उघडकीस येतील आणि या बांधकामामागे असलेले नेते कोण आहेत, हे स्पष्ट होईल. त्यामुळे या चौकशी होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा- करोना काळात अवाजवी देयके देणाऱ्या रुग्णालयांना अभय? मनसेचा ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागावर आरोप

बेकायदा बांधकामांप्रकरणी एकूण १४ आजी-माजी सहाय्यक आयुक्तांच्या चौकशी सुरु आहे. त्यात प्रतिनियुक्तीवरील ९ अधिकाऱ्यांच्या चौकशीसंबंधीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे तर, पालिकेतील पाच अधिकाऱ्यांची पालिकेमार्फत विभागीय चौकशी सुरु आहे, असे स्पष्टीकरण महापालिका मुख्यालय विभागातील अधिकाऱ्यांनी दिले आहे.

हेही वाचा- डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद

बेकायदा बांधकामप्रकरणी याचिका

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर ६ जुलै २०२२ रोजी लोकायुक्तांनी अशा बांधकामांना वीज, पाणी जोडणी देऊ नये तसेच इतरही असे महत्वाचे आदेश दिले होते. त्यानंतरही बांधकामे सुरु असल्यामुळे याप्रकरणी लोकायुक्तांकडे पुन्हा तक्रार करणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.