करोना संकटामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर क्रेडाई एमसीएचआय ठाणे तर्फे आयोजित केलेल्या मालमत्ता विक्री प्रदर्शनाला आजपासून (शुक्रवार) सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच १४ मार्चपर्यंत सुरु राहणाऱ्या प्रदर्शनात ठाणे शहर, घोडबंदर, मुलूंड, भांडुप आणि कल्याण भागातील गृहप्रकल्पांचा समावेश आहे. त्यात २९ लाखांच्या पुढील १ बीएचकेची तर, ९१ लाखांच्यापुढे २ बीएचकेच्या घरांचे पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय प्रदर्शनात विविध बँका आणि वित्त संस्थेच्या माध्यमातून गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठाणे येथील वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या मैदानात भरविण्यात आलेल्या मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, क्रेडाई एमसीएचआय ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
Liquor Licenses pune
पुण्यात ४ जूनपर्यंत दारूचे नवे परवाने, रिन्युएशन बंद
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु

या प्रदर्शनात ठाणे शहरातील हरिनिवास, घोडबंदर परिसर, भांडुप, मुलूंड आणि भांडूप परिसरातील गृह प्रकल्प मांडण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक घोडबंदर भागातील प्रकल्पांचा समावेश आहे. ३२० चौरस फुटांपासून ते ४५० चौरस फुटांपर्यंतची १ बीएचके घरे विक्रीसाठी ठेवण्यात आलेली असून त्यांच्या किंमती २९ लाखांच्या पुढे आहेत. त्यापैकी अनेक प्रकल्पात उद्यान, व्यायामशाळा तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सहाशे चौरस फुटांच्या पुढील २ बीएचकेच्या घरांचा पर्यायही देण्यात आला असून या घरांच्या किंमती ९१ लाखांच्या पुढे आहेत. यातील काही प्रकल्पात आकर्षक फर्निचर, नामांकित कंपन्यांच्या साहित्यांचा वापर करून आलीशान घरे बनविण्यात आलेली आहेत. याशिवाय, त्यापेक्षाही मोठ्या घरेही प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. एकूणच परवडणाऱ्या घरांपासून ते मोठी आलिशान घरे असे सर्वच पर्याय प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच प्रदर्शनात विविध बँका आणि वित्त संस्थांकडून गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय, फर्निचर, इलेक्ट्रीक साधने आणि नळ अशा वस्तुंचे स्टॉलही प्रदर्शनात मांडण्यात आलेले आहेत.

ठाण्यातील प्रकल्पांची मांडणी –

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध मोठे प्रकल्पांची उभारणी केली जात आहेत. त्यातील काही प्रकल्प स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबविले जात आहेत. अशा प्रकल्पांची मांडणी महापालिकेने प्रदर्शनात केली आहे. त्यात डिजी ठाणे, स्मार्ट जलमापके, सीसीटिव्ही आणि वायफाय यंत्रणा, कॅमेऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष, पदपथ, सार्वजनिक वाहतूक सुविधा, पाणी पुरवठा योजनेची पुर्नबांधणी, अर्बन रेस्ट रुम, सौर उर्जा, मलनि: सारण प्रकल्प, गावदेवी भुयारी वाहनतळ, खाडी किनारा सुशोभिकरण, नवीन स्थानक, मासुंदा तलावाभोवती काचेचा पदपथ, तलावांचे सुशोभिकरण, ठाणे पुर्व सॅटीस, अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी नाट्यगृहांची उभारणी केली जात आहे –

“गृह प्रकल्पात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात पण, ठाण्यात मात्र त्यातही वेगळेपण जाणवते. शालेय शिक्षण ठाण्यातच झालेले असल्यामुळे जुने ठाणे आणि बदलेले नवीन ठाणे असे दोन्ही पाहिले आहेत. या शहरात पायाभूत सोयीसुविधांचे प्रकल्प उभारले जात असतानाच, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी नाट्यगृहांची उभारणी केली जात आहे. शिवाय, शैक्षणिक आणि आरोग्यासाठीही तितकेच महत्व दिले जात आहेत. तसेच करोना काळात आर्थिक मंदीत सापडलेल्या बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्क आणि मालमत्ता करात सवलती दिल्या होत्या. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. ” अशी प्रतिक्रिया ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम स्टीलच्या दरावर झाला –

“राज्य सरकारने मुद्रांक आणि प्रिमीयम शुल्कात सवलत दिल्यामुळे बांधकाम क्षेत्र उभारी घेत असून त्याचबरोबर ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाल आहे. त्यामुळे ही सवलत पुन्हा लागू करावी. रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम स्टीलच्या दरावर झाला असून स्टीलच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यात सिमेंटच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. बांधकाम व्यवसायिकांना आहेत, त्याच दरात घरे विकायची आहेत. दर वाढले म्हणून ते प्रकल्पांचे काम दर कमी होईपर्यंत थांबू शकत नाही. असे केले तर रेरा अंतर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे याचाही सरकारने विचार करायला हवा.” असं एमसीएचआय ठाणेचे माजी अध्यक्ष अजय आशर म्हणाले आहेत.

सर्वचप्रकारच्या घरांसह गृह कर्जाची सुविधाही उपलब्ध –

“करोना संकटामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर क्रेडाई एमसीएचआय ठाणेच्यावतीने मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात आलेले असून यामध्ये सर्वचप्रकारच्या घरांसह गृह कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर घर खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.”अशी प्रतिक्रिया एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली आहे.