scorecardresearch

ठाण्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या रॅलीमुळे शहरात अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाली.

Manoj Jarange Patil thane
ठाण्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

ठाणे – मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या रॅलीमुळे शहरात अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. खारेगाव टोलनाका, माजिवडा, नितीन कंपनी आणि घोडबंदर भागात वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसला. वाहन चालकांना अवघ्या १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागत होता. दुपारी अवजड वाहतूक सुरू होताच कोंडीत वाढ झाली.

ठाणे शहरात मंगळवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजित करण्यात आले होते. या सभेपूर्वी जरांगे यांच्या स्वागतासाठी रॅली काढण्यात आली. खारेगाव टोलनाका, माजिवडा उड्डाणपूल, नितीन कंपनी मार्गे पाचपाखाडी येथून राम मारुती रोड, तलावपाली मार्गे गडकरी रंगायतन अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीमुळे कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल लागू केले होते. तरीही या कालावधीत रॅलीच्या कालावधीत शहरात कोंडी झाली.

brawl at visarjan in buldhana, buldhana ganesh visarjan brawl, buldhana 6 injured during fight
विसर्जनादरम्यान बुलढाण्यात तुंबळ हाणामारी, सहा गंभीर
Cell phone theft in immersion procession
विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा उच्छाद…पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ पोर्टलवर ‘एवढ्या’ नागरिकांनी केल्या तक्रारी
pune heavy rain, rainwater accumulated on the roads in pune, pune street lights off due to rain
पावसाळापूर्व कामे केल्याचा महापालिकेचा दावा फोल; पुण्यातील रस्ते जलमय
Jarange family Buldhana
जरांगे कुटुंबीय जालन्याहून बुलढाण्याकडे रवाना, मराठा आरक्षण क्रांती मोर्च्यात होणार सहभागी

हेही वाचा – ठाण्यात टीएमटी प्रवाशांचे हाल, वाहकांच्या कमतरतेमुळे बसगाड्यांचा तुटवडा

हेही वाचा – अंबरनाथ : शहरातला एकमेव बाह्यवळण रस्ता अंधारात, वाहन चालकांची गैरसोय, मद्यपी, प्रेमी युगलांना मोकळे रान

माजिवडा ते कापूरबावडी, साकेत पूल, गोकुळ नगरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यांनतर पूर्व द्रुतगती महामार्ग येथील नितीन कंपनी भागातून दुचाकी रॅली नितीन कंपनी, पाचपाखाडी येथे आली. त्यामुळे नितीन कंपनी ते ज्ञानेश्वर नगर, महापालिका मुख्यालय परिसरात कोंडी झाली. तसेच घोडबंदर मार्गावरही कोंडी झाली. ठाणे शहरात टेंभी नाका, राम मारुती रोड, गडकरी रंगायतन परिसरात रस्ते बंद करण्यात आले होते. या बदलामुळे नागरिकांचे हाल झाले. बाजारपेठ परिसरातही कोंडी झाली. अरुंद रस्ते आणि वाहतूक बदलामुळे कोंडीत भर पडली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The rally organized to welcome manoj jarange patil led to traffic jam on many roads in thane city ssb

First published on: 21-11-2023 at 13:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×