घोडबंदरच्या गायमुख खाडी किनारी भागात उभारण्यात आलेल्या चौपाटीची अवघ्या तीन वर्षातच दुरावस्था झाल्याची बाब पुढे येताच ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या कारभारावर टिका होऊ लागली होती. या टिकेनंतर आता महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाने दुरावस्था झालेल्या चौपाटीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेऊन कामांची निविदा काढली आहे. तसेच चौपाटीवरील अंधार दूर करण्यासाठी नवीन वीज जोडणी घेण्यासाठी पाऊले उचलली असली तरी याठिकाणी देखरेख ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकाची अद्यापही नेमणुक करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुरुस्ती कामानंतर पुन्हा चौपाटीची दुरावस्था होण्याची भिती व्यक्त होत आहे.

हेही वाचा- डोंबिवलीत फडके रस्त्यावर अमेरिकन नागरिकाची महिलांकडून फसवणूक

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Election campaigning was stopped due to rain
प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने घोडबंदरच्या गायमुख खाडी किनारी भागात चौपाटी उभारण्यात आली आहे. या चौपाटीचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट २०१९ मध्ये करण्यात आले होते. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तसेच त्याच्या जोड कामांसाठी सुमारे ४० कोटींचा निधी खर्च केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलेल्या या चौपाटीची अवघ्या तीन वर्षातच दुरावस्था झाल्याची बाब मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी काही महिन्यांपुर्वी उघडकीस आणली होती. याठिकाणी अनेक अनुचित प्रकार घडण्याची भिती व्यक्त करत ही चौपाटी महिला आणि मुलींसाठी सुरक्षित नसल्याचा दावा त्यांनी केला होता. या चौपाटीवरील विद्युत खांब विजेअभावी बंद आहेत. त्यामुळे चौपटीवर सर्वत्र अंधार असतो. सुरक्षितेच्या दृष्टीने येथे एकही सुरक्षा रक्षक नसतो. या चौपाटीवर स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात आली आहे. परंतु वीज आणि पाण्याची व्यवस्था तिथे नाही. शिवाय प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले असून येथील नळ गायब झालेले होते. याठिकाणी रात्री मद्यपी लोकांचा सर्रास वावर असून जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे समोर आले होते. अवघ्या तीन वर्षातच चौपाटीची दुरावस्था झाल्याने ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या कारभारावर टिका होऊ लागली होती. या टिकेनंतर आता महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाने दुरावस्था झालेल्या चौपाटीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेऊन या कामांसाठी १ लाख ३५ हजारांची निविदा काढली आहे. यानुसार नळ बसविणे, प्लंबिंग कामाबरोबरच किरकोळ दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत. या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.

हेही वाचा- प्रेमसंबंधातून कल्याणमध्ये मानखुर्दच्या तरुणाची हत्या

चौपाटीवरील स्वच्छतागृहातील गायब झालेले नळ पुन्हा बसविण्यात येणार असून त्याचबरोबर नळ जोडणीसह इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाने निविदा काढली आहे. चौपाटीवरील अंधार दूर करण्यासाठी नवीन वीज जोडणी घेण्याचे कामही सुरु केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. परंतु याठिकाणी देखरेख ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणुक करण्याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे दुरुस्ती कामानंतर पुन्हा चौपाटीची दुरावस्था होण्याची भिती आहे, असे मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले.