कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने एका रिक्षाचालकाकडून २०० रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवृत्ती मेळावणे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. लाच घेतानाचा व्हिडिओ रिक्षाचालकाच्या मोबाईलमध्ये चित्रीत झाला आहे. अधिकारी रिक्षाचालकाकडून ५०० रुपयांची लाच मागताना व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या घटनेनंतर संबंधित लाचखोर अधिकाऱ्याची वाहतूक नियंत्रण विभागात बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा- डोंबिवलीतील भोपरमधील शांती निकेतन कॉम्पलेक्सच्या आठ विकासकांना समन्स, ठाणे विशेष तपास पथकाचे आदेश

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

सोमवारी रात्री चक्कीनाका भागातून जात असताना एका रिक्षा चालकाकडून वाहतुकीचा नियमभंग झाला. चक्कीनाका भागात कर्तव्यावर असलेले वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मेळावणे यांनी चालकाला थांबण्यास सांगितले. दंडात्मक कारवाईचा इशारा चालकाला दिला. रिक्षा चालक दिवसभराचा व्यवसाय करुन घरी चालला होता.

हेही वाचा- ठाणे : मानसिक स्थिती स्थिर नसलेल्या वयोवृद्धेचे सोन्याचे दागिने गहाळ; पोलिसांच्या प्रयत्नानंतर दागिने कुटुंबाला मिळाले परत

मेळावणे यांनी चालकाला वाहतूक पोलीस चौकीत नेले. तेथे त्यांनी चालकाकडे ५०० रुपये लाचेची मागणी केली. आपल्याकडे एवढे पैसे नाहीत असे सांगून चालकाने ‘साहेब १०० रुपये घ्या’, असे बोलून तेथून निघण्याचा प्रयत्न केला. ‘असे १०० रुपये येणारे जाणारे सहज देऊन जातात. तू ५०० रुपये दे’ असा तगादा मेळावणे यांनी लावला. हा सगळा प्रकार चालकाच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे याची थोडीही जाणीव मेळावणे यांना नव्हती. चालक गयावया करुन १०० रुपये घेण्याची मागणी अधिकाऱ्याकडे करत होता. रडकुंडीला येत चालकाने १०० रुपयांची नोट पुन्हा साहेबांपुढे केली. त्यावेळी यामध्ये काय होणार आहे. आणखी थोडी रक्कम टाक असे बोलून मेळावणे यांनी चालकाला वाढीव रक्कम टाकण्यास सांगितले. २०० रुपयांची रक्कम मेळावणे चालकाकडून स्वीकारत असल्याचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला.

हेही वाचा- अंबरनाथः मुख्यमंत्र्यांविरूद्ध घोषणाबाजी भोवली; ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल

रिक्षा चालकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला लाचखोरीचा प्रकार समाज माध्यमावर प्रसारित केला. दिवसभर याच चित्रफितीची चर्चा सुरू होती. वाहतूक विभागाच्या वरिष्ठांकडे ही चित्रफित पोहचली. अखेर निवृत्ती मेळावणे यांनी लाच स्वीकारुन सेवाशर्तीचा भंग केला म्हणून त्यांची तात्काळ कोळसेवाडी वाहतूक शाखेतून वाहतूक नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. मेळावणे यांची विभागीय चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले. मेळावणे यांच्या सेवानिवृत्तीसाठी सहा महिने शिल्लक असताना त्यांनी हा लाचखोरीचा प्रकार केला आहे.