ठाणे- भिवंडीतील एका नामवंत महाविद्यालयात विद्यार्थ्याला काॅपी करू दिली नाही म्हणून त्याने उपप्राचार्याला धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मी आरपीआयचा उपाध्यक्ष आहे, तुझा खूनच करेल अशी धमकी त्याने दिली. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी येथील एका महाविद्यालयात कला शाखेतील पदवीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा सुरु होती. या परिक्षा दरम्यान रुपेश बनसोडे हा विद्यार्थी वारंवार कॅापी करत असल्याचे पर्यवेक्षकांच्या लक्षात आले. त्यावर परिवेक्षकाने त्याला समज दिली. यानंतर रुपेश वर्गातून निघून गेला. काही काळानंतर रुपेश आणि त्याच्यासोबत दादु गायकवाड या दोघांनी परिक्षा सुरु असलेल्या वर्गात थेट प्रवेश केला. दादु गायकवाड या व्यक्तीने पर्यवेक्षकांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उपप्राचार्य हे वर्गात आले असता, दादु याने उपप्राचार्य यांना धमकी दिली. मी आरपीआयचा उपाध्यक्ष आहे, तुझा खूनच करेल अशी धमकी त्याने दिली. प्राचार्य यांनाही शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. या संदर्भात, नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.