डोंबिवलीत जवाहिऱ्याच्या दुकानात चोरी | Theft at jewelery shop in Dombivli amy 95 | Loksatta

डोंबिवलीत जवाहिऱ्याच्या दुकानात चोरी

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील रस्त्यावरील एका जवाहिऱ्याच्या दुकानात बुधवारी रात्रीच्या वेळेत स्वच्छतागृहाच्या खिडकीतून शिरुन चोरट्यांनी ८० हजार रुपयांचा सोेने, चांदीचा ऐवज चोरला आहे.

डोंबिवलीत जवाहिऱ्याच्या दुकानात चोरी
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले( संग्रहित छायचित्र )

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील रस्त्यावरील एका जवाहिऱ्याच्या दुकानात बुधवारी रात्रीच्या वेळेत स्वच्छतागृहाच्या खिडकीतून शिरुन चोरट्यांनी ८० हजार रुपयांचा सोेने, चांदीचा ऐवज चोरला आहे.सर्वाधिक वर्दळीच्या आणि रामनगर पोलीस ठाण्यापासून जवळ असलेल्या जवाहिऱ्याच्या दुकानात चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा >>>कल्याण मध्ये बुलेट चालकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, नाक, हाताचे हाड मोडले

पोलिसांनी सांगितले, चंदनसिंग कडेच्चा यांचे दत्तनगर मध्ये आयरे रस्त्यावर देवश्री ज्वेलर्स दुकान आहे. बुधवारी रात्री नऊ वाजता त्यांनी दुकान बंद केले. दुसऱ्या दिवशी ते सकाळी दुकानात आले. तेव्हा त्यांना दुकानाच्या पाठीमागील बाजुकडील स्वच्छता गृहाची खिडकी तोडलेली आणि दुकानातील सोन्याचा ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समजले.मालक चंदनसिंग यांनी ही माहिती रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासून चोरट्यांचा तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 17:21 IST
Next Story
कल्याण मध्ये बुलेट चालकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, नाक, हाताचे हाड मोडले