scorecardresearch

ठाणे : वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीच्या कंपनीत चोरी

वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी वकिल जयश्री पाटील यांच्या कंपनीत ४ लाख २५ हजार रुपयांच्या साहित्यांची चोरी झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे.

Gunratna sadavarte
गुणरत्न सदावर्ते ( संग्रहित छायाचित्र )

ठाणे : वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी वकिल जयश्री पाटील यांच्या कंपनीत ४ लाख २५ हजार रुपयांच्या साहित्यांची चोरी झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. वागळे इस्टेट येथील आयटी पार्क परिसरात जयश्री पाटील यांची झेन ग्रुप नावाची कंपनी आहे. रविवारी कंपनी बंद होती. त्यावेळी दोन चोरट्यांनी कंपनीचे टाळे तोडून कंपनीत प्रवेश केला. तसेच कंपनीतील ३५ हजार रुपये किमतीचे वातानुकूलीत यंत्र, तीन लाख रुपये किमतीच्या खिडकीच्या स्लाईड, ४० हजार रुपये किमतीचा टिव्ही, ५० हजार रुपयांचे धुलाई यंत्र असे एकूण ४ लाख २५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी केले होते. याप्रकरणी जयश्री पाटील यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल यातील एकजण अल्पवयीन असून एकाला अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 17:40 IST

संबंधित बातम्या