ठाणे : राज्य शासनाने ठाणे महापालिकेला शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भिवंडीतील आतकोली भागात ३४ हेक्टर इतकी जागा देऊ केली आहे. या कचराभुमीच्या भुखंडावर दगडाचे उत्खनन करत सुमारे ५४१० ब्रास दगड आणि नैसर्गिक जलस्रोतातून दररोज सुमारे १० ते १५ टॅँकरद्वारे पाण्याची चोरी करण्यात येत असल्याची बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी पालिका प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनंतर पडघा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नाही. यामुळे ठाणे महापालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती. याठिकाणी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नव्हती. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पालिकेने ही कचराभुमी बंद केली. त्यानंतर तात्पुत्या स्वरुपात सुरू केलेली शहराबाहेरील भांडार्ली येथील कचराभुमीही पालिकेने बंद केली. डायघर घनकचरा प्रकल्प सुरू झाला असला तरी तो पुर्णपणे कार्यान्वित होऊ शकलेला नाही. या प्रकल्पासही नागरिकांकडून विरोध होत आहे. या कचरापेचातून सुटका करण्यासाठी राज्य शासनाने ठाणे महापालिकेला शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भिवंडीतील आतकोली भागात ३४ हेक्टर इतकी जागा देऊ केली आहे. या भूखंडावर ठाणे महापालिकेच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पाच्या पूर्व तयारीचे काम सुरू आहे. त्याची पाहाणी घनकचरा विभागाचे अधिकारी सातत्याने करतात.

Sanjay Raut On Mumbai Municipal elections 2025
Sanjay Raut : महाविकास आघाडीत फूट? “काय होईल ते होईल, आम्ही सर्व महापालिका स्वबळावर लढवणार”, ठाकरे गटाची मोठी घोषणा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
msrdc first step to get shaktipeeth project underway
‘शक्तिपीठ’ला पुन्हा बळ; राज्य सरकारचा हिरवा कंदिल
Andheri zopu yojana, Eligibility , Disqualification ,
अंधेरीतील झोपु योजनेत मृत व्यक्तींच्या नावे पात्रता! आणखी सहा झोपडीवासीयांची पात्रता रद्द
aaditya Thackeray
राज्य सरकारकडची थकीत रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करा, आमदार आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
thane Chinese manja loksatta news
ठाण्यात चिनी मांजाच्या जप्तीसाठी दुकानात धाडी, पालिकेच्या पथकाकडून आतापर्यंत एकूण ४५० दुकानांची तपासणी
Permission , robotic parking lot, Mumbadevi,
मुंबादेवीतील अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळाच्या कामाला परवानगी द्यावी, मुंबई महापालिकेचे राज्य सरकारला साकडे
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!

हे ही वाचा… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार

अशाचप्रकारे ३ जानेवारी रोजी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे हे इतर अधिकाऱ्यांसह या प्रकल्पस्थळाची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्यांना बंद करण्यात आलेले प्रवेश रस्ते अनधिकृतपणे खुले करण्यात आल्याचे निर्दशनास आले. तसेच, काही अनोळखी व्यक्तींमार्फत अवैधरित्या दगडखाणीचे उत्खनन झाल्याचेही लक्षात आले. त्यांनी ही बाब पडघा मंडळ अधिकाऱ्यांना सांगितली. मंडळ अधिकारी संतोष आगिवले यांनी या स्थळाची पाहणी केल्यावर अंदाजे ५४१० ब्रास दगडाचे उत्खनन केल्याचे लक्षात आले. तसेच, या भूखंडावरील नैसर्गिक जलस्रोतातून दररोज सुमारे १० ते १५ टॅँकरद्वारे पाण्याचीही चोरी होत असल्याची बाब परिसरातील नागरिकांकडील माहितीतून उघड झाली. त्याची गंभीर दखल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतली असून त्यांच्या निर्देशानुसार, दगड उत्खनन आणि पाणी चोरीबद्दल सहाय्यक आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) सुनील मोरे यांनी पडघा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ३०३(२) आणि ३२९(३) या नुसार गुन्हा दाखल करून घेतला आहे. पुढील तपास पडघा पोलीस करीत आहेत.

Story img Loader