कळव्याच्या काही भागांत आज वीज नाही

कळवा शहरात टोरंट पॉवर कंपनीकडून विद्युत पुरवठा केला जातो.

ठाणे : कळवा शहरात टोरंट पॉवर कंपनीतर्फे शनिवारी सकाळी वीजवाहिनीच्या दुरूस्ती आणि निगराणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कळवा शहराच्या काही भागांतील वीजपुरवठा सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खंडीत राहणार आहे.

कळवा शहरात टोरंट पॉवर कंपनीकडून विद्युत पुरवठा केला जातो. शनिवारी येथील वीजवाहिन्यांच्या दुरूस्ती आणि निगराणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे येथील आतकोनेश्वर नगर, सफायर रुग्णालय, भास्कर नगर, पौंड पाडा, घोलाई नगर, आनंद विहार संकुल, अपर्णा राज सोसायटी, कोकणेश्वर पार्क, शिवशक्ती नगर, गुलमोहर, स्टॅन्डर्ड केमिकल, म्हात्रे कंपाऊंड, शिवशक्ती नगर या भागांचा विद्युत पुरवठा सकाळी खंडीत राहणार आहे, असे टोरंट पॉवर कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: There is no electricity in some parts of kalav today akp

ताज्या बातम्या