डोंबिवली : डोंबिवलीत शेलार नाका भागातील त्रिमूर्तीनगर भाग हा चोऱट्यांचा अड्डा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. दोन दिवसापूर्वी या भागातील चार चोरट्यांना रामनगर पोलिसांनी एका लुटमारी प्रकरणात अटक केली होती. त्याच्या दुसऱ्याच्या दिवशी त्रिमूर्तीनगर मधील चोरट्यांनी पिसवली येथील एका चालकाच्या घरात दिवसाढवळ्या घुसून दोन मोबाईलची चोरी केली.

गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. रामजुगेश यादव (४२) या चालकाने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. रामजुगेश हे पिसवली येथील टाटा पाॅवर हाऊस जवळ राहतात. अक्षय कचरू अहिरे (२३, रा. त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी, शेलारनाका), चंद्रकांत रमाकांत जमादार (२३, रा. दुर्गा सोसायटी, हनुमाननगर, आजदेगाव, डोंबिवली) अशी आरोपींची नावे आहेत.

Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

हेही वाचा >>> कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग २०२५ पर्यंत सुरू होणार, १५२१ कोटीची निविदा प्रक्रिया जाहीर

आरोपी अक्षय, चंद्रकांत गुरुवारी दुपारी पिसवली येथील माझ्या घरी आले. त्यांनी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. त्यांनी घराच्या खोलीतील टेबलावर ठेवलेले दोन मोबाईल चोरुन नेले, असे चालक रामजुगेश यांनी तक्रारीत म्हटले आहे. गेल्या वर्षापासून डोंबिवली परिसरात चोऱ्या करणारे चोरटे त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीत पोलिसांना आढळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी शेलारनाका, त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी भागात एक पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी डोंबिवलीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी याच झोपडपट्टीतील चार तरुणांनी एका फूल विक्रेत्याला लुटले होते.