ठाणे – जिल्हा कृषी विभागातर्फे खरीप हंगामाचे नियोजन करण्यात येत असून याअंतर्गत कृषी विभागाकडून सुमारे दीड हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. आंबा, फणस, जांभूळ, सीताफळ या फळपिकांचा यात समावेश असणार आहे. मागील वर्षी जिल्हा कृषी विभागाकडून सुमारे १ हजार ८० हेक्टर वर फळ पिकांची लागवड करण्यात आली होती. यामध्ये जवळपास ९० टक्के क्षेत्रावर आंब्याची लागवड करण्यात आली होती. या क्षेत्रात वाढ करण्यात येणार असून आंब्याबरोबरच इतर फळांचीही अधिक लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून फळ पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. यामध्ये आंब्याची लागवड करण्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक कल असल्याचे मागील दोन ते तीन वर्षांत दिसून आले आहे. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ या तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. मागील वर्षी जिल्हा कृषी विभागाकडून सुमारे ८०० हेक्टरवर आंब्याची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. नियोजनाहून अधिक सुमारे ९५० हेक्टरवर आंब्याची लागवड झाली होती. प्रामुख्याने कोकणातून येणाऱ्या आंब्याचा हंगाम संपल्यानंतर शहापूर आणि मुरबाड येथील आंबे बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. चवीला अत्यंत गोड आणि रसाळ असल्याने या आंब्याची बाजारपेठेत कायम चलती असते. यातून शेतकऱ्यांचे उत्तम अर्थार्जनही झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील काही वर्षांच्या कालावधीत आंबा लागवडीकडे कल दिसून आला आहे. मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला होता. त्यामुळे यंदा कृषी विभागाकडून मागील वर्षी झालेल्या आंब्याच्या लागवडीच्या क्षेत्रात अधिक वाढ न करता गतवर्षी प्रमाणे सुमारे १ हजार हेक्टरवर आंब्याची लागवड करण्याचे नियोजन सुरू आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना ही बदलत्या हवामानामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये. तसेच इतर पिकांचेही अधिक उत्पादन व्हावे असा कृषी विभागाचा मानस आहे, अशी माहिती अधिकारी दीपक कुटे यांनी दिली आहे.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai
नवी मुंबईत २८ किलो एकल वापर प्लास्टिक जप्त, ९० हजार रुपयांचा दंड वसूल
Navi Mumbai
नवी मुंबई : एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती
water resources department issue notice to pmc
पाणी चोरी, प्रदूषण… ‘जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस का बजावली?

हेही वाचा – दिव्यात रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा, भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून ५८ कोटींचा निधी मंजूर

यंदा कृषी विभागाकडून सुमारे १ हजार ते अकराशे हेक्टरवर आंब्याची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर उर्वरीत ४०० ते ५०० हेक्टर क्षेत्रावर जांभूळ फणस, सीताफळ यांची अधिक लागवड कशी होईल याबाबत कृषी विभागाकडून तयारी करण्यात येत आहे.

हेही वाचा – स्माशनभूमीच्या जागेत सभागृहाची उभारणी नको; कोपरीकरांची पालिकेकडे मागणी

बाजारपेठेची आवश्यकता

जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली जाते. या भाजीपाल्याची परदेशात तसेच आसपासच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये थेट विक्री केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र इतर फळांच्या बाबतीत असे होताना दिसून येत नाही. मुरबाड आणि शहापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यातील बहुतांश आंबा हा शहरातील बाजारपेठांमध्ये थेट विक्रीसाठी जातो. तर ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करणाऱ्या काही संस्था या आंबा उत्पादकांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देतात. मात्र अधिक उत्पादन घेतल्यावर कृषी विभागाने फळांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.