ठाण्यात नाशिकहून रिक्षामधून आणला ३५ किलो गांजा; तीन तस्करांना अटक

ठाणे ते नाशिक तब्बल ३५ किलो गांजाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

thane

एकीकडे एनसीबीने ताब्यात घेतलेल्या आर्यन खानचे अमली पदार्थ प्रकरण गाजत असताना रिक्षाच्या सीटखाली कप्पे बनवून ठाणे ते नाशिक तब्बल ३५ किलो गांजाची तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला मुंबई – नाशिक महामार्गावर खारेगाव येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ठाण्यात नेमका कोणाला हा गांजा विकण्यात येणार होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

नाशिकमधून गांजा तस्कर ठाण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने मुंबई – नाशिक महामार्गावर खारेगावहून मुंब्र्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सापळा रचला. त्याठिकाणी नाशिकहून येणारी संशयित रिक्षा अडवली असता त्यात बसलेल्या तीन व्यक्तींना खाली उतरवले. या रिक्षाची झडती घेतली असता आतील सीट, डीकी व पत्र्याच्या खाली गोण्यांमध्ये दडवून ठेवलेला ३५ किलो गांजा पोलिसांना आढळला. या प्रकरणी रिक्षा चालक कलीम शेख व त्याचे इतर दोन साथीदार मोहसीन शेख, लाईक सिद्धीकी या गांजा तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three arrested for ganja smuggling in thane hrc

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या