ठाणे जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी तीन जणांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे, ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे आणि ॲड बाळासाहेब भुजबळ यांचा समावेश आहे. त्यापैकी सचिन शिंदे यांच्याकडे मुख्य प्रवक्ता पदाचा विशेष पदभार सोपविण्यात आला आहे.

हेही वाचा- ठाणे : भिवंडीत बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट; आणखी तीन डाॅक्टर अटकेत

chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…

विविध विषयांतील अभ्यासू व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारे पदाधिकारी म्हणून सचिन शिंदे, राहुल पिंगळे हे ओळखले जातात. सचिन शिंदे हे पूर्वी पासूनच काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. शिंदे आणि पिगंळे हे दोघे काँग्रेसचे निष्ठावान पदाधिकारी असून वेळोवेळी माध्यमांसमोर पक्षाची बाजू मांडत असतात. त्यामुळेच त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे, असे ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच बाळासाहेब भुजबळ हे पेशाने वकील असून कायदे विषयक त्यांचा चांगला अभ्यास आहे.

हेही वाचा- डोंबिवलीत वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्या चालकांना यमराजाकडून गुलाबपुष्प; कोळसेवाडी वाहतूक विभागाची गांधीगिरी

गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कार्याला अधिक वाव मिळावा तसेच पक्षाची बाजू अधिक सक्षमतेने मांडता यावी या हेतूने त्यांची ठाणे जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्त केली आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे काम करणार असल्याचे सचिन शिंदे व राहुल पिंगळे यांनी सांगितले.