भिवंडी येथील भाग्यनगर भागात सततच्या वादाला कंटाळून आशिष चौधरी (२०) याने वडिलांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार करून त्यांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
भाग्यनगर येथे आशिष हा त्याचे वडिल विजय, आई आणि लहान भावासोबत राहतो. विजय यांना मद्याचे व्यसन होते. त्यामुळे विजय हे वारंवार घरी कुटुंबियांसोबत वाद घालत असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरूवारीही रात्री ११:३० वाजेच्या सुमारास विजय हे पत्नीशी वाद घालत होते. त्याचा जाब त्यांच्या लहान मुलाने विचारला असता, विजय यांनी मुलासही मारहाण सुरू केली. त्यामुळे संतापलेल्या आशिष आणि विजय यांच्यामध्येही वाद झाले. या वादातून आशिषने विजय यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार केला. या घटनेत विजय यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आशिषला अटक केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tired of constant arguments the son killed his father amy
First published on: 06-08-2022 at 14:34 IST