कल्याण : २७ गाव, डोंबिवली, कल्याण ते टिटवाळा हा २० किलोमीटरचा वर्तुळकार शहरा बाहेरील रस्ता टिटवाळा येथे कल्याण-अहमदनगर महामार्गाला गोवेली (मुरबाड रस्ता) येथे जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. टिटवाळा ते मुरबाड रस्ता हा वर्तुळकार रस्त्याचा आठवा टप्पा असणार आहे.वर्तुळकार रस्त्याच्या या महत्वपूर्ण टप्प्यामुळे दुर्गाडी, डोंबिवली, भिवंडी भागातून येणारी वाहने कल्याण शहरातून न जाता वर्तुळकार रस्त्याने टिटवाळा येथून गोवेली दिशेने जाऊन तेथून मुरबाड, नगरकडे निघून जाणार आहेत. त्यामुळे कल्याण शहरातील शहाड उडडाण पूल, उल्हासनगर, वालधुनी भागातील रस्त्यांवर बाहेरुन येणाऱ्या वाहनांचा ताण कमी होणार आहे.

टिटवाळा ते गोवेली रस्ते कामासाठी भूसंपादन प्रक्रिया, कामाचा सल्लागार नेमण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. २७ गावातील हेदुटणे, काटई, भोपर, आयरे, कोपर, मोठागाव, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, ठाकुर्ली, पत्रीपूल, दुर्गाडी, आधारवाडी, गंधारे, बारावे ते टिटवाळा असा २० किमीचा वर्तुळकार रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्याचे टिटवाळा ते गंधारे, दुर्गाडी ते गंधारे हे महत्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. या रस्त्यांमध्ये काही बांधकामे असल्याने त्यांचे पुनर्वसन, मोबदला देण्याचा विषय प्रलंबित असल्याने हे टप्पे मार्गी लागले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात पालिकेने डोंबिवलीतील मोठागाव भागातील वर्तुळकार रस्ते कामासाठी या भागातील सुमारे ६० रस्ते बाधितांना हटविले. तिसऱ्या टप्प्यातील सुमारे ४६ रस्ते बाधितांकडून जमीन हस्तांतरण होत नसल्याने काही जमिनी सरकारी, रेल्वेच्या असल्याने पालिकेला या टप्प्यातून १०० टक्के भूसंपादन करता आले नाही. १०० टक्के भूसंपादन केले जात नाही तोपर्यंत आम्ही रस्ते कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करणार नाही अशी भूमिका एमएमआरडीएने घेतली आहे.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
road work contractor marathi news, mumbai municipal corporation marathi news
मुंबई: शहर भागातील कामे रखडवणाऱ्या कंत्राटदाराकडून अद्याप दंड वसुली नाही, एक महिन्याची मुदत संपूनही मुंबई महापालिकेची चालढकल
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल

हेही वाचा : ‘अवघ्या दीड वर्षाच्या नातवालाही नाही सोडलं’, उद्धव ठाकरेंच्या टीकेने एकनाथ शिंदे व्यथित, संताप व्यक्त करत म्हणाले “ज्या दिवशी…”

प्राधिकरणाच्या बैठकीत मोठागाव भागात ८६ टक्के भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादन लवकर केले जाईल असे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे या रस्ते कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. रस्ते बाधितांना पालिकेच्या झोपु योजनेत घरे देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

हेही वाचा : फेरीवाल्यांकडून प्रवासी महिलेस मारहाण, ठाण्यात फेरीवाल्यांची अरेरावी टोकाला

भोपर-हेदुटणे भूसंपादन रखडले

वर्तुळकार रस्त्याचा पहिला टप्पा हा २७ गावातून हेदुटणे येथून सुरू होतो. हा रस्ता कोळे, काटई, भोपर येथून आयरे, कोपर, रेतीबंदर मोठागाव भागातून पुढे जातो. भोपर भागात गेल्या चार वर्षा पासून पालिका, भूमीअभिलेख विभागाचे अधिकारी वर्तुळकार रस्त्याच्या सर्व्हेक्षण, भूसंपादन प्रक्रियेसाठी जात आहेत. भोपर भागात वर्तुळकार रस्त्याच्या मार्गात बेकायदा चाळी, बंगले, इमारती आहेत. त्यामुळे या भागातील रहिवासी पालिका कर्मचारी पोलीस बंदोबस्तात गेले तरी तेथे आंदोलन करुन कर्मचाऱ्यांना मोजणी, सर्व्हेक्षण करण्यास स्थानिक रहिवासी विरोध करतात. याविषयावर स्थानिक लोकप्रतिनिधी मतपेटीला धोका नको म्हणून गुपचिळी धरुन आहेत. विकासाच्या गप्पा मारणारे, सतत ट्वीटर युध्द खेळणारे याविषयी काहीही बोलत नसल्याने त्यांनी याविषयी आक्रमक भूमिका घेण्याची मागणी शहरी नागरिकांकडून केली जात आहे.