scorecardresearch

प्रेम प्रकरणाच्या रागातून टिटवाळ्यात महिलेवर मुले चोरीचा आरोप ; पीडितेला बेदम मारहाण

गुरुवारी सकाळी मारहाण झालेली महिला आपल्या तीन मुलांना सकाळी साडे सात वाजता गुरु गोविंद शाळेत सोडण्यासाठी गेली होती.

Disputes over paying admission fee in the Kalamboli Iron market
प्रातिनिधिक छायाचित्र

प्रेम प्रकरणाच्या रागातून एका महिलेवर कुटुंबीयांनी मुले चोर असल्याचा आरोप करत टिटवाळा येथे रस्त्यात बेदम मारहाण केली. या महिलेला इतर नागरिकांनीही मारहाण करावी म्हणून कुटुंबीयांनी ती मुले चोरत असल्याचा ओरडा केला. भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण होत असल्याने या महिलेने सहा जणांच्या तावडीतून स्वताची सुटका करुन टिटवाळा पोलीस ठाणे गाठले. एका कुटुंबीयांमधील सहा जणांच्या विरुध्द टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

विक्रम अनंता भोईर, अनंता भोईर, वैभव भोईर, विद्या रवी भोईर, सुरेखा अनंता भोईर, अन्य एक महिला (सर्व राहणार, यशोदा बंगला, वरपगाव, कल्याण-मुरबाड महामार्ग) अशा सहा जणांच्या विरुध्द मारहाण झालेल्या महिलेने तक्रार केली आहे. वरप गावातील एक ३१ वर्षाची महिला पती आणि तीन मुलांसह राहत होती. ती भिवंडी जवळील सावदगाव येथील साठवणूक केंद्रात काम करत होती. आपल्या पत्नीचे वरप गावातील विक्रम अनंता भोईर याच्या बरोबर प्रेम संबंध असल्याची माहिती मिळताच पती पत्नीपासून विभक्त राहत होता. पत्नी आणि तिची तीन मुले वरप गावात राहत आहेत. पीडित महिलेने प्रेम असलेल्या विक्रमशी संपर्क करुन तू आपल्याशी विवाह कर आणि माझ्या मुलांचा सांभाळ कर असे सांगितले. त्याने नकार दिला. याऊलट त्याने मारहाण केली होती. त्यावेळी पीडितने त्याच्या विरुध्द बलात्काराचा गुन्हा पीडितेने दाखल केला होता.

हेही वाचा : कारागृहातून आठ दिवसांपूर्वीच आला बाहेर आणि पुन्हा ‘आत’ गेला !

गुरुवारी सकाळी मारहाण झालेली महिला आपल्या तीन मुलांना सकाळी साडे सात वाजता गुरु गोविंद शाळेत सोडण्यासाठी गेली होती. तेथून पायी परत घरी येत असताना तिला एक इनोव्हा गाडी आडवी झाली. त्या गाडीत पत्नी सोबत प्रेम असलेल्या विक्रमचे वडील अनंता भोईर आणि इतर आरोपी होते. त्यांनी पीडित महिलेला शिवीगाळ करत जबरदस्तीने आपल्या वाहनात बसविले आणि तिला टिटवाळा येथे नेले. तेथे तुझे लग्न विक्रम सोबत लावायचे असे ते बोलू लागले. मोटार टिटवाळयात पोहचताच तेथे विक्रम दुचाकी घेऊन उभा होता. पीडित महिलेने मोटारीतून उतरतून विक्रमच्या दिशेने धाव घेतली.

हेही वाचा : चांदणी चौकातील अतिरिक्त मार्गिका सुरू ; वाहतूक कोंडीची समस्या कमी झाल्याचा एनएचएआयचा दावा

विक्रमने दुचाकीचा तिला जोराचा धक्का देऊन खाली पाडून तिला बेदम मारहाण सुरू केली. विक्रमचे वडील अनंता यांनीही महिलेला मारहाण केली. या दोघांच्या तावडीतून सुटून पीडित महिला टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळत सुटली. त्यावेळी सहा आरोपी तिचा पाठलाग करत ही महिला मुले पळविणारी आहे असे ओरडत तिच्या पाठीमागे पळू लागले. पादचाऱ्यांनी या महिलेला पकडले. पुन्हा आरोपींनी तिला काठ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण होत असताना चोर म्हणून आपणास कोणीही वाचविण्यास आले नाही. या घटनेनंतर विक्रम याने पीडित महिलेचा मोबाईल काढून घेतला. त्याच्यासह इतर आरोपी पळून गेले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2022 at 15:48 IST
ताज्या बातम्या