ठाणे : महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत प्रस्थापितांना फटका बसला आहे. तसेच या आरक्षणामुळे प्रस्थापितांबरोबरच नवख्या उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे. एक ते दोन ठिकाणी विद्यमान नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला असून त्यापैकी काहींना बाजूच्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची तर काहींनी कुटुंबातील इतर सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्याची तयारी सुरु केली आहे.

हेही वाचा >>> अविनाश भोसले यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ८ जूनपर्यंत CBI कोठडी

Rahul gandhi
“सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता
Code of Conduct in Thane
ठाण्यात आचारसंहितेचा भंग, मतदारांना योजनांच्या माध्यमातून प्रलोभने देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न

या सोडतीत घोडबंदर भागातील पाच प्रभागातील १५ पैकी ९ जागा, दिव्यातील तीन प्रभागातील ९ पैकी ६ जागा, किसननगर, श्रीनगर, सीपी तलाव भागातील चार प्रभागातील १२ पैकी ८ जागा आणि मुंब्य्रातील २५ पैकी १३ जागा महिलांसाठी राखीव झाल्या असून यामुळे या प्रभागांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला नगरसेवकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

हेही वाचा >>> गौतम अदानी आणि मुकेश अंबानींवर आहे विदेशी कर्जाचा डोंगर; बँक ऑफ बडोदाच्या अहवालातून माहिती उघड

ठाणे महापालिकेची निवडणूक २०११ सालच्या जणगणनेनुसार होणार असून यानुसार शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी आहे. या लोकसंख्येनुसार एकूण ४७ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी ४६ प्रभाग तीन सदस्यांचा तर एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहे. या प्रभागांमधून एकूण १४२ नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ७१ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी मंगळवारी सोडतद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले.

हेही वाचा >>> Sidhu moose wala cremation : सिद्धू मुसेवाला अनंतात विलीन, मूळ गावी अंत्यसंस्कार; आई-वडिलांना दु:ख अनावर

अनुसूचित जातीसाठी आयोगाने थेट आरक्षित केलेल्या १० प्रभागांपैकी ३, १२, १५, २३, २९ मधील अ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या तर, १०, २४, २७, ३४ आणि ४४ मधील ‘अ’ अनुसूचित जातीच्या पुरुषांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी अयोगाने थेट आरक्षित केलेल्या ३ प्रभागांपैकी ५ अ, २९ ब जागा महिलांसाठी तर, ६ अ जागा अनुसूचित जमातीच्या पुरुषांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ६४ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४७ जागा निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. तर उर्वरित १७ जागांकरीता आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात प्रभाग १ ब, २ ब, १३ ब, १६ ब, १८ ब, २० ब, २१ ब, २५ ब, २६ ब, ३२ ब, ३६ ब, ३९ ब, ४१ ब, ४३ ब, ४५ ब, ४६ ब आणि ४७ ब प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> प्रशांत किशोर यांची काँग्रेसवर सडकून टीका; म्हणाले “…तेव्हापासून ठरवलं सोबत काम करणार नाही”

घोडबंदर येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. या भागातून यापूर्वी शिवसेनेचे नरेश मणेरा आणि सिद्धार्थ ओवळेकर असे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी एकाला आरक्षणाचा फटका बसणार असला तरी त्या नगरसेवकाला शेजारच्या म्हणजेच ५ क्रमांकाच्या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या निवडणुकीत राबोडी भागातून राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि सुहास देसाई हे दोघे एकाच प्रभागातून निवडून आले होते. या भागात नव्या रचनेत प्रभाग क्रमांक १८ तयार करण्यात आला असून त्याठिकाणी दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे त्यापैकी एका नगरसेवकाला माघार घेऊन त्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात येईल, अशी चर्चा आहे.

हेही वाचा >>> ठरलं! हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार; २ जून रोजी पक्षप्रवेश सोहळा

महागिरी कोळीवाडा भागातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या ठाण्याच्या माजी उपमहापौर पल्लवी कदम यांचा प्रभाग नव्या रचनेत २९ क्रमांकाचा झाला असून हा प्रभाग कोपरीतील चेंदणी कोळीवाडा भागाला जोडण्यात आला आहे. या प्रभागात दोन जागा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या जागेवर त्या निवडणूक लढवतील किंवा त्यांचे पती पवन कदम हे निवडणूक लढवतील, अशी चर्चाही सुरु झाली आहे.

हेही वाचा >>> हनुमान जन्मस्थळाचा वाद विकोपाला; तोडगा काढण्यासाठी महंत भेटले आणि तिथेही एकमेकांना भिडले

गेल्या निवडणुकीत आनंदनगर, कशीश पार्क प्रभागातून नरेश म्हस्के आणि विकास रेपाळे हे निवडून आले होते. नव्या रचनेत हा प्रभाग २७ क्रमांकाचा झाला असून या प्रभागातील एक जागा अनुसूचित जाती पुरुष तर दुसरी जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. यामुळे तिसऱ्या जागेवर म्हस्के यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग सुकर झाला असला तरी रेपाळे यांना मात्र निवडणूक लढविण्यासाठी प्रभाग शोधावा लागणार आहे. त्यामुळे ते कोणत्या प्रभागातून निवडणूक लढविणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

हेही वाचा >>> मुख्यमंत्रीपदावरुन सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांमध्ये तू तू मैं मैं सुरु असतानाच भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बहुदा उद्धव ठाकरे…”

तसेच दिवा परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याठिकाणी नव्या रचनेत ४३, ४४ आणि ४५ असे तीन प्रभाग तयार झाले असून येथील ९ पैकी ६ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांना निवडणूक लढण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली असली तरी महिला आरक्षणामुळे शिवसेनेच्या माजी इतर नगरसेवकांची मोठी अडचण झाली आहे. त्यातच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन आदेश भगत आणि निलेश पाटील हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे उर्वरित दोन पुरुषांच्या जागेवर कुणाला उमेदवारी दिली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> पिंपरी चिंचवड महापालिकेची महिला आरक्षण सोडत जाहीर; कोणाला मिळणार कोणता प्रभाग? घ्या जाणून

घोडबंदर भागातील १, २, ३, ४ आणि ५ अशा एकूण पाच प्रभागातील १५ पैकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. दिव्यातील ४४, ४५, ४६ अशा तीन प्रभागातील ९ पैकी ६ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर, किसननगर, श्रीनगर, सीपी तलाव भागातील २३,२४, २५, आणि २६ अशा चार प्रभागातील १२ पैकी ८ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. मुंब्य्रातील २५ पैकी १३ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यामुळे या प्रभागांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला नगरसेवकांची संख्या अधिक होणार असल्याचे दिसून येते.