घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या खांबांवर तुळई बसविण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात येणार आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर मार्गावर ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. २१ ते ३१ मे पर्यंत दररोज मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळेत हे वाहतूक बदल लागू असणार आहे.
उरण जेएनपीटीहून हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे गुजरात वसईच्या दिशेने वाहतूक करत असतात. गेल्याकाही वर्षांपासून घोडबंदर मार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली- गायमुख या मेट्रो प्रकल्पाचे काम एमएमआरडीएममार्फत सुरू आहे. या कामांतर्गत एमएमआरडीएने घोडबंदर मार्गावर खांब उभारले असून त्यावर तुळई बसविली जाणार आहे. या कामासाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहे. त्यामुळे आज १९ मे ते ३१ मे या कालावधीत दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हे बदल लागू असणार आहे. या काळात घोडबंदर मार्गावरून होणारी अवजड वाहतूक भिवंडीतून वळविण्यात आली आहे. तर, हलकी वाहने वेदांत रुग्णालय आणि विहंग हिल्स गृहसंकुल भागातून सेवा रस्त्याने वाहतूक करतील.
असे आहेत वाहतूक बदल

  • मुंबई नाशिक महामार्गाने माजीवडा, कापूरबावडीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी चौकात प्रवेशबंदी असेल. ही वाहने कापूरबावडी चौकातून बाळकूम नाका, भिवंडी-आग्रा मार्ग, कशेळी, काल्हेर, अंजुरफाटा मार्गे जातील. किंवा माजीवडा उड्डाणपूलाखालून खारेगाव, मानकोली नाका मार्गे जातील.
  • मुंब्रा-कळवा येथून खारेगाव मार्गे घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना खारेगाव येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी पूलाखालून मानकोली, अंजुरफाटा मार्गे वाहूक करतील.
  • नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना मानकोली येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मानकोली पूलाहून उजवीकडे वळण घेऊन अंजुरफाटा मार्गे वाहतूक करतील.
  • हलकी वाहने वेदांत रुग्णालय आणि विहंग हिल्स येथून वाहतूक करत असल्यास येथील वाहने या भागातून सेवा रस्त्यावरून वाहतूक करतील.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन