गणेश विसर्जनाच्या दिवशी ९ सप्टेंबर रोजी वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी विठ्ठलवाडी शहरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी या वाहतूक बदलाबाबत माहिती दिली आहे.

गणेश विसर्जन निमित्त विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या विसर्जन मिरवणुका उल्हासनगर शहरतील बाजारपेठा असणाऱ्या भागांतून काढल्या जातात. त्यामुळे आधीच खरेदी साठी आलेल्या नागरिकांची आणि मिरवणुकी वेळी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेत हे वाहतूक बदल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात गणेश मुर्ती विसर्जनासाठी भक्तांना टोकदार दगड आणि खड्यातून काढावी लागते वाट

असे आहेत वाहतूक बदल

श्री राम चौक ओ.टी. सेक्शन चौक मेनबाजार- व्हिनस चौक- नेताजी चौक-भाटीया चौक-३९ सेक्शन-गाऊन बाजार- दुध नाका- मठ मंदिर चौक या विसर्जन मार्गावरील वाहतूक तसेच रहदारी ही गणपती विसर्जन मिरवणूक पुढील चौकात जाई पर्यंत ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहेत.
तर या वाहनांना श्री राम चौकाकडून ओ.टी सेक्शन कडे जाणारी वाहतूक पेट्रोलपंपाचे बाजून व्हि.टी.सी. रोड मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे. तसेच ओटी सेक्शन कडून मेन मार्केट कडे जाणारी वाहतुक ही उल्हास स्टेशन कडे मार्गे इच्छित स्थळी जातील. तर नेताजी चौकाकडुन व्हिनस चौकाकडे जाणारी वाहतुक ही लालचक्की चौक व मानेरेगाव रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. कैलास कॉलनी कडून भाटीया चौक व नेताजी चौकाकडे येणारी वाहतुक ही संभाजी चौक व उल्हासनगर स्टेशन मार्गे इच्छित स्थळी जातील. दुधनाका कडून गाऊन मार्केटकडे येणारी वाहतूक ही ओ.टी सेक्शन उल्हासनगर ५ मार्गे इच्छित स्थळी जातील.

या ठिकाणी असेल नो पार्किंग
श्री राम चौक-ओ.टी सेक्शन चौक-मेनबाजार-व्हिनस चौक-नेताजी चौक-भाटीया चौक- ३९ सेक्शन-गाऊन बाजार दुध नाका-मठ मंदिर चौक या विसर्जन मार्गावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत ‘नो पार्किंग’ करण्यात येत आहे.

येथे करता येईल पार्किंग
श्री राम चौक- ओटी सेक्शन चौक- मेनबाजार- व्हिनस चौक- नेताजी चौक- भाटीया चौक-३९ सेक्शन-गाऊन बाजार- दुध नाका-मठ मंदिर चौक हा मुख्य विसर्जन मार्ग सोडून इतर पर्यायी मार्गावर पार्किंग मुभा देण्यात आली आहे. आहे.

हे वाहतूक बदल ९ सप्टेंबर (अनंत चर्तुदशी) या गणेश विसर्जन दिवशी दुपारी २ वाजेपासून गणेश मूर्ती विसर्जन कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहतील. त्याच बरोबर हे वाहतुक बदल ही पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रूग्णवाहिका, गणेश मुर्ती विसर्जनातील वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही. असे पोलीस प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.