कल्याण डोंबिवली शहराच्या प्रमुख समस्यांपैकी एक समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. मात्र ही वाहतूक कोंडी का होते याबाबत कल्याण डोंबिवलीकरांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. शहरात विशेषतः भाडे सोडण्यासाठी आणि भरण्यासाठी रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावल्या जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. याकडे वाहतूक विभागाचं दुर्लक्ष होतं आहे अशीही तक्रार कल्याण डोंबिवलीकरांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्या आणि डोंबिवली ही दोन्ही शहरं सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांची शहरं म्हणून ओळखली जातात. बहुतांश चाकरमानी हे प्रवासासाठी रिक्षांवर अवलंबून असतात. त्यातच परमिट प्रक्रिया सोपी झाल्याने रिक्षांची संख्या दोन्ही शहरांमध्ये वाढली आहे. शहरात वाहतूक कोंडीही रिक्षांमुळे होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. अनेकदा रिक्षा ह्या वाटेल तशा उभ्या केलेल्या असतात. त्यातच भाडं दिसलं की कुठेही प्रवासी घेण्यासाठी रिक्षा उभ्या केल्या जातात. एक रिक्षा रस्त्यात थांबली की मागे वाहनांची रांग लागते. मोकळी जागा दिसली की कुठेही रिक्षा उभी केली जाते , अतिरिक्त रिक्षाही वाढल्या आहेत , रिक्षा चालकांची तपासणी केली जात नाही ? कागदपत्रे बघितली जात नाहीत ? आरटीओ आणि वाहतूक विभागाचे कोणतंही नियंत्रण रिक्षाचालकांवर नाही असा आरोपी एमएच 05 या प्रवासी संघटनेने केला आहे.

रिक्षाचालक बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या करतात , मर्जीप्रमाणे भाडं घेतात , वाहनांच्या सलग रांगेतून मध्येच प्रवासी भाडं घ्यायला रिक्षा थांबवतात. यामुळे अपघातांची शक्यता असते असे डोंबिवलीकरांनी सांगितले आहे. मात्र लोकांसाठी असलेल्या लोकप्रतिनिधींचंही वर्चस्व रिक्षा युनियनवर आहे. त्यामुळे आपल्याच नागरिकांना होणाऱ्या त्रासावर युनियन नेते पुढाकार घेतील का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचप्रमाणे आरटीओ आणि वाहतूक विभाग हे रिक्षा चालकांना शिस्त लावतात का? त्यावरही नागरिक लक्ष ठेवून आहेत. कारण कायद्याची कोणतीही भीती नसल्याने हा मनमानी कारभार सुरू असल्याचं कल्याण डोंबिवलीकरांनी सांगितलं आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion in kalyan dombivli is due to unruly rickshaw pullers citizens allege also complained that rto is ignoring rno scj
First published on: 28-03-2023 at 14:57 IST