कल्याण- शिळफाटा रस्त्यावर लोढा पलावा जंक्शन येथे वाहतूक नियोजनाचे काम करत असताना कोळसेवाडी वाहतूक शाखेतील हवालदार मधुकर घुगे यांना दुचाकीवरील दोन जणांनी मंगळवारी सकाळी बेदम मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याने घुगे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. भगवान गोरपेकर, दीपक कांबळे अशी दुचाकी स्वारांची नावे आहेत.

हवालदार घुगे मंगळवारी सकाळी शिळफाटा रस्त्यावरील लोढा जंक्शन येथे वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते. त्यावेळी तेथून आरोपी भरधाव वेगाने दुचाकीवरुन जात होते. हवालदाराने त्यांना थांबण्याचा इशाला केला तर, ते पुढे जाऊन थांबले. त्यांनी हवालदार घुगे यांना शिवीगाळ बेदम मारहाण केली. जमिनीवर पाडून त्यांना इजा करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी हवालदाराचा गणवेश फाडला. सरकारी कामात अडथळा आणल्याने हवालदार घुगे यांनी तक्रार केली आहे.

heavy goods vehicles ban on Ghodbunder road for six month
घोडबंदरकरांची अवजड वाहतूकीच्या कोंडीतून सुटका? पुल कामासाठी अतिअवजड मालवाहू वाहनांना बंदी
pimpri traffic police marathi news,
पिंपरी: फॅन्सी नंबर प्लेट, काचेला काळी फीत लावणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांची मोहीम; ४०६ वाहनांवर कारवाई
Police action against 142 drunken drivers in Dhulwadi pune news
धुळवडीला १४२ मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात; नियमभंग करणाऱ्या साडेअकराशे वाहनचालकांवर कारवाई
dombivli marathi news, company employee beaten up marathi news
डोंबिवली : कंपनी मालकाने साथीदारांसह केली कर्मचाऱ्याला बेदम मारहाण