ठाणे पूर्वेकडील ठाणेकर वाडी ते ठाणे पूर्व रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या बाजूला दुतर्फा काही चारचाकी वाहन चालक बेकायदेशीररीत्या वाहने उभी करत आहेत. या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी झालेली दिसते. या रस्त्यावरून दर तासाला बेस्ट आणि टीएमटी बस सेवेची वर्दळ असते. त्यामुळे बसगाडय़ांना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या वाहनांचा अडथळा होऊन वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या या समस्येला वाचा फोडून परिसरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी, म्हणून ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. अनधिकृत चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या पार्किंग प्रश्नावर जर वाहतूक पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही, तर महिला एकत्र येऊन आगामी काळात संबंधित वाहनांच्या चाकांमधील हवा काढून आंदोलनास सुरुवात करणार आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी ठाणेकरवाडी ते ठाणे रेल्वे स्थानक हा रस्ता मोकळा करावा, ही विनंती.