ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव, साकेत पूलावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचा परिणाम बुधवारी वाहतूकीवर झाला. ठाण्याहून नाशिक, भिवंडी आणि नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई नाशिक मार्गावरून दिवसाला हजारो वाहने वाहतूक करतात. ठाणे, घोडबंदर येथून अनेकजण त्यांच्या वाहनाने नवी मुंबई, नाशिक किंवा भिवंडी गाठण्यासाठी साकेत पूल, खारेगाव मार्गाचा वापर होतो. परंतु गेल्याकाही दिवसांपासून या भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. बुधवारी सकाळी या खड्ड्यांमुळे वाहतूकीचा खोळंबा झाला. साकेत पूल ते कॅडबरी जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे अवघे १० मिनीटांचे अंतर पार करण्यास वाहन चालकांना पाऊण तास लागत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam on mumbai nashik highway pits transportation ysh
First published on: 06-07-2022 at 10:14 IST