scorecardresearch

महामार्गावर अपघातामुळे कोंडी

वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले.

Traffic jam Eastern Expressway truck accident majiwada thane
महामार्गावर अपघातामुळे कोंडी (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: पूर्व द्रुतगती महामार्गावरील माजिवडा भागात मंगळवारी सकाळी चालकाचा ताबा सुटून ट्रक महामार्गावर उलटला. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले.

auto passengers
ठाण्यातील कोंडीमुळे रिक्षा टंचाई; गावदेवी भागात प्रवाशांना अर्धा ते पाऊण तासानंतर उपलब्ध होतेय रिक्षा
Borghat on the Pune-Mumbai route
पुणे- मुंबई मार्गावरील बोरघाट धुक्यात हरवला; वाहतूक कोंडीमुळे नव्हे तर धुक्यामुळे द्रुतगतीमार्ग मंदावला!
Pune-Satara highway
गणेशोत्सवामुळे पुणे-सातारा महामार्गावर वाहनांची गर्दी
st bus accident, mumbai goa highway st accident, st bus accident on mumbai goa highway
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव जवळ एसटी बसला भीषण अपघात; एक ठार १९ जखमी

भिवंडी येथून एक ट्रक दादरच्या दिशेने वाहतूक करत होता. हा ट्रक सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास माजिवडा येथे आला असता चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक उलटून अपघात झाला. या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली.

हेही वाचा… डोंबिवलीत बिगारी कामगाराला खुर्चीला बांधून बेदम मारहाण

या घटनेची माहिती राबोडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ट्रक हायड्रा यंत्राच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला. त्यांनतर येथील वाहतूक सुरळीत झाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traffic jam on the eastern expressway due to a truck accident near majiwada thane dvr

First published on: 03-10-2023 at 10:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×