नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून ठाणे वाहतूक पोलिसांनी आता वाहन चालकांना समाजमाध्यमांद्वारे वाहतूक नियमांचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. ‘खेळायचं असेल तर दांडिया खेळा- जिवाशी काय खेळता’, कार चालविताना सिट बेल्ट वापरा- आनंदे नवरात्रीचे रंग उधळा, हेल्मेट असता शीरी- माता भवानी रक्षण करी. अशा विविध जनजागृतीचे संदेश दिले जात आहेत. हे संदेश पाहून वाहन चालकांकडून हळूहळू वाहतूक नियमांचे पालन होत असल्याचे दिसत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात

गेल्याकाही वर्षांत ठाणे जिल्ह्यात नागरिकीकरण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. घोडबंदर भाग, कल्याण-डोंबिवली, बदलापूर या भागात मुंबई आणि उपनगरात राहणारे अनेकजण वास्तव्यास येत आहेत. त्यामुळे शहरात वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यातुलनेत पुरसे रुंद रस्ते नसल्याने अपघातांनाही आमंत्रण मिळत असते. अनेकदा दुचाकी चालक शीरस्त्राण (हेल्मेट) वापरत नसतात. चार चाकी चालकही आसन पट्टी वापरत नसल्याने अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. अपघात टाळण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन होऊ नये पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु मनुष्यबळाअभावी पोलिसांना सर्वच ठिकाणी कारवाई करणे शक्य होत नसते. त्यामुळे वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असतानाचे चित्र दिसते. चालकांकडून नियमांचे पालन व्हावे यासाठी ठाणे पोलिसांकडून सण-उत्सवांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. त्यामुळे यावर्षी नवरात्रौत्सवानिमित्ताने ठाणे पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाने जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा >>> पुणे : आधी रिक्त पदे, शिष्यवृत्तींचे प्रलंबित प्रश्न सोडवा ; उच्च शिक्षण क्षेत्रातून नाराजीचा सूर

‘देवीच्या भक्तीत तल्लीन होऊनी नवरात्रिच्या रंगांची उधळन करूनी, वाहतूकीच्या नियमांकडे लक्ष देऊया-स्वत:सोबत इतरांचे जीवन सुकर करूया’, ‘लाल-पिवळा- हिरवा रंग आहेत तीन वाहतुकीचे नियम पाळून साजरे करूया नवरात्रिचे दि’ असे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी विविध सामाजिक संदेश ठाणे पोलिसांकडून समाजमाध्यमांवर दिले जात आहे. या संदेशांमुळे नागरिकांमध्ये जनजागृती होत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police give lessons to drivers through navratri festival amy
First published on: 28-09-2022 at 16:36 IST