ठाणे : शहरात काही मुजोर रिक्षा चालकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर मागील सहा महिन्यात ठाणे वाहतुक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा महिन्यात ठाणे वाहतुक पोलिसांनी १३ कोटी १५ लाख २२ हजार ३५० रुपये इतका दंड रिक्षा चालकांवर आकारला आहे.
एक लाख १० हजार ४७३ ई- चलानद्वारे ही कारवाई झाली असून अनेक रिक्षा चालकांवर चार ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त चलान आहेत. रिक्षातून अधिक प्रवासी वाहतूक, रिक्षा थांबा सोडून प्रवासी वाहतूक करणे, बेदरकार रिक्षा चालवणे अशा प्रकारच्या कारवाईचा सर्वाधिक समावेश आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे ठाणे आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरात सुमारे लाखभर रिक्षा आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे, औद्योगिक क्षेत्र, गोदामे आणि लघु उद्योग आहेत. यामुळे पर्यटक, नोकरदार, व्यवसायिक हे या भागात शहरांत येत असतात.
सार्वजनिक बसगाड्यांची सुविधा अपुऱ्या असल्याने काही प्रवासी वेळ वाचावा यासाठी रिक्षा वाहतुकीवर अवलंबून असतात. याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करू लागले आहेत. अशा रिक्षा चालकांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ठाणे वाहतूक पोलिसांनी यावर्षी १ जानेवारी ते २३ जून या कालावधीत ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर ई- चलान यंत्राद्वारे कारवाई केली. यामध्ये एक लाख १० हजार ४७३ ई चलानद्वारे कारवाई करण्यात आली. तसेच १३ कोटी १५ लाख २२ हजार ३५० रुपये इतका दंड आकारला आहे.
रिक्षा चालक गणवेशात नसणे, रिक्षा परवाना नसणे, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, रिक्षा थांबा सोडून बाहेर थांबणे, चालकाच्या बाजूला प्रवासी बसविणे, सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणे, वाहतूक सिग्नलचे उल्लंघन अशा विविध उल्लंघनांचा समावेश आहे.
जागा नसतानाही प्रवासी रिक्षामध्ये बसण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रिक्षा चालक देखील चार किंवा पाच प्रवासी घेऊन वाहतुक करतात. प्रवाशांनी रिक्षामध्ये जागा नसताना चालकाच्या बाजूला बसण्याचा प्रयत्न करू नका आणि चालकांनी रिक्षामध्ये तीन पेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक करू नये. तसेच रिक्षा चालकांनी गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. जिथे रिक्षा थांबा नाही तिथे वाहने उभी करू नये. पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग
दंडात्माक कारवाई आकडेवारी / ई-चलान / दंड
- १) चालकाच्या बाजूला प्रवासी बसवणे – ६५ हजार ७७६ – ८ कोटी ६० लाख ६८ हजार
- २) रिक्षा थांबा सोडून बाहेर थांबणे – १२ हजार ७५३ – १ कोटी ५८ लाख ७६ हजार ५००
- ३) सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणे – १० हजार ३६९ – १ कोटी ११ लाख २६ हजार ५००
- ४) गणवेशाशिवाय वाहन चालवणे – ७ हजार ७५१ – ८५ लाख ८ हजार
- ५) क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी – ७ हजार ०३७ – १४ लाख ४ हजार ८००
- ६) वाहतूक सिग्नलचे उल्लंघन – २ हजार ०३९ – १६ लाख ७९ हजार ५००
- ७) एकेरी मार्ग उल्लंघन – १ हजार ९४१ – १४ लाख ३ हजार
- ८) पोलीस आदेश पाळला नाही – १ हजार १८१ – ८ लाख ८१ हजार२५०
- ९) प्रवासी नेण्यास नकार – ४९७ – २४ हजार ८००
- १०) वैध विम्याविना वाहन चालवणे – ४७४ – १० लाख १० हजार
- ११) परवाना नसलेले चालक – ३६६ – ३५ लाख ४० हजार
- १२) मद्यप्राशन करून वाहन चालवणे – २८९ –