सरकारी-खाजगी कार्यालयांमध्ये काम करणारे बहुतांशी नोकरदार आपल्या खासगी वाहनांमध्ये दर्शनी भागात आपण काम करत असलेल्या आस्थापना, कार्यालयांच्या नावाच्या नामा पट्ट्या लावतात. अशा सर्व वाहन चालक आणि नोकरदार यांच्यावर डोंबिवली, कल्याण वाहतूक विभागाने कारवाई सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील दोन दिवसांत डोंबिवली, कल्याणमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १७० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवली, कल्याण, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ डॉक्टर वास आंबेडकर परिसरातील बहुतांशी नोकरदार मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात नोकरी-व्यवसायासाठी जातो. नोकरदार वर्ग प्रवास करताना आपल्या खासगी वाहनाच्या दर्शनी भागात आपण काम करीत असलेल्या भारत सरकार, महाराष्ट्र शासन, आर्मी, महापालिका, प्रेस, फायर ब्रिगेड, पोलीस, प्रतिष्ठित कंपन्यांची नावे अशा आस्थापनांच्या नावाच्या पट्ट्या लावून प्रवास करतात. हे प्रवासी प्रवास करताना आपण अती महत्त्वाची व्यक्ती आहोत अशा अविर्भावात प्रवास करतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police to take action against vehicles using name plate of departments tlsp0122 pmw
First published on: 27-02-2022 at 13:53 IST