येत्या फेब्रुवारी मध्ये देशातील ब्राम्हण उद्योजकांची दोन दिवसीय एक परिवर्तन परिषद डोंबिवलीत आयोजित केली जाणार आहे. या परिषदेच्या पूर्वतयारीसाठी येत्या मंगळवारी मुंबई परिसरातील ब्राम्हण उद्योजकांची एक परिषद येत्या मंगळवारी (ता. ८) डोंबिवली एमआयडीसी मधील सोनारपाडा येथील दुर्गांकुर सभागृहात आयोजित केली आहे, अशी माहिती ब्राम्हण उद्योजक मुंबई विभाग संघटनेचे कार्यकारी संचालक अरविंद कोऱ्हाळकर यांनी दिली.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील ‘हा’ प्रसिद्ध चौक अखेर वाहतूक कोंडीतून मुक्त होणार

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब
Sunetra Pawar And Supriya Sule
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर येणार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड

डोंबिवलीतील परिषदेला मुंबई, पनवेल, नवी मुंबई, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे, बोरिवली परिसरातून सुमारे २०० ब्राम्हण उद्योजक उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. सकाळी १० वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
येत्या फेब्रुवारी महिन्यात डोंबिवलीत सावित्रीबाई फुले रंगमंदिरात होणाऱ्या दोन दिवसांच्या परिषदेला देशव्यापी विविध ज्ञातींमधील ब्राम्हण उद्योजक, व्यावसायिक सहभागी होणार आहेत. ‘विचार, विकास आणि व्यवहार’ या शीर्षकाखाली ही परिषद होणार आहे. देशासह विदेशातील विविध ज्ञातींमधील ब्राम्हण उद्योजक, व्यावसायिकांना एका व्यासपीठावर आणून त्यांची एक अखंड साखळी तयार करणे. आपापल्या उद्योग, व्यवसायातील माहितीची अदान प्रदान करणे, उत्पादित मालाची देवाणघेवाण, या माध्यमातून अवलंबित्व वाढविणे, नवउद्योजक ब्राम्हण तरुणांना उद्योग व्यवसायात उभारी देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन, अर्थसाहाय्यासाठी यंत्रणा उभारणे अशा अनेक विषयांवर या परिषदेत चर्चा केली जाणार आहे, असे कल्याण डोंबिवली ब्राम्हण उद्योजक संघटनेमधील एक पदाधिकारी अरविंद कोऱ्हाळकर यांनी सांगितले.

हेही वाचा- ठाणे महापालिकेच्या कोरस प्रसूतीगृहात पहिल्यांदाच यशस्वी प्रसूती शस्त्रक्रिया

येत्या फेब्रुवारीत सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आयोजित ब्राम्हण उद्योग परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर, उद्योजक दीपक घैसास, बांधकाम व्यावसायिक संजय लोंढे, उद्योजक शशांक पेंडसे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. अशाप्रकारे यापूर्वी सात परिषदा पार पडल्या आहेत. गेल्या वर्षी पुणे येथे आयोजित ब्राम्हण उद्योजक परिषदेला देश, विदेशातून ५०० ब्राम्हण उद्योजक, व्यावसायिक उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात होणारी अशाप्रकारची ही पहिलीच ब्राम्हण उद्योजक परिषद आहे, असे कोऱ्हाळकर यांनी सांगितले. या परिषदेतील सहभागासाठी इच्छुकांनी ७२०८२६६१६९ या व्हाॅट्सप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.