पाकिस्तान सुपर लीगमधील क्रिकेट सामन्यांमध्ये सट्टा खेळणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने घोडबंदर येथून अटक केली. दीपक ठक्कर (५६) आणि जितेंद्र चंदे (४८) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ४ मोबाईलसह १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

घोडबंदर येथील एका हॅाटेलमध्ये काहीजण सट्टा खेळत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. त्याआधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस नाईक अमोल देसाई यांच्या पथकाने सापळा रचून दिपक आणि जितेंद्र या दोघांना ताब्यात घेतले.

Crime Branch raid on Betting on IPL Cricket Match in Kothrud
कोथरुडमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा; गुन्हे शाखेचा छापा, दहा सट्टेबाज अटकेत
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा
md siraj
बंगळुरूच्या गोलंदाजांकडून कामगिरीत सुधारणेची अपेक्षा! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

हे दोघेही पाकिस्तान सुपर लीग सामन्यांमध्ये सट्टा लावत असल्याचे चौकशीत समोर आले. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.