ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला बंदूक विक्रीसाठी आलेल्या आकाश शिरसाठ (२६) आणि गोविंद जाधव (२३) यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या मालमत्ता शोध कक्षा विभागाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन देशी बनावटीच्या बंदूक, आठ जिवंत काडतुसे जप्त केले.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला एकजण शस्त्रास्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मालमत्ता शोध कक्षास मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आकाश शिरसाठ याला कोपरी येथून ताब्यात घेतले. आकाशकडून पोलिसांनी दोन बंदूका जप्त केल्या. तसेच आठ जिवंत काडतूसेही त्याच्याकडे आढळून आली. या बंदूक तो गोविंद जाधव याला विकणार होता, असे त्याच्या चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आकाश यालाही जळगाव येथून अटक केली.

Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…