scorecardresearch

‘पठाण’ चित्रपटाचा शेवटचा खेळ जीवावर बेतला; मीरा रोड परिसरात भरधाव वेगाने जाणार्‍या दोन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू

भरधाव वेगाने जात असताना वळणावर तोल सुटून दुचाकी खाली पडली आणि पाठीमागून येणार्‍या ट्रकच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.

accident
मीरा रोड परिसरात भरधाव वेगाने जाणार्‍या दोन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू

पठाण चित्रपटाचा शेवटचा खेळ पाहून घरी परतणार्‍या दोन दुचाकीस्वार तरुणांचा अपघातात मृत्यू झाला. मीरा रोड येथील गोल्डन नेस्ट परिसरात गुरूवारी मध्यरात्री ही घटना घडली. भरधाव वेगाने जात असताना वळणावर तोल सुटून दुचाकी खाली पडली आणि पाठीमागून येणार्‍या ट्रकच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- ठाणे : भिवंडीत तीन वर्षांच्या मुलीची हत्या, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमा गुरूवारी देशभरात प्रदर्शित झाला. मीरा रोड येथील आझाद नगर परिसरातील दहा तरुणांचा एक गट या सिनेमाचा शेवटचा खेळ पाहण्यासाठी भाईंदर येथील मॅक्सस सिनेमागृहात गेले होते. रात्री खेळ संपल्यावर परताना अन्वरअली मणियार (२२) आणि तुफेल शमिम शहा( २५ ) एका दुचाकीवरून जात होते. गोल्डन नेस्ट येथून जात असताना वळण घेताना त्यांचा तोल सुटला आणि त्यांची दुचाकी खाली पडली. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकखाली ते सापडले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचराासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचरादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरिभाऊ भोसले यांनी दिली. या प्रकरणी ट्रकचालकाला नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 12:47 IST