डोंबिवली : डोंबिवलीतील दावडी गावात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला आणि त्याच्या मुलाला नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील दोन भावांनी गुरुवारी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. डम्पर खरेदीतील व्यवहारावरुन ही धमकी देण्यात आली आहे, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले. महादूसिंग महेर (४७, समर्थ काॅम्पलेक्स, दावड़ी, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार व्यावसायिकाचे नाव आहे. प्रदीप सुनील सरोदे, नीलेश सुनील सरोदे (रा. शिर्डी, नगर) अशी धमकी देणाऱ्या भावांची नावे आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात महेर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार महेर यांचा डम्पर होता. डम्परसाठी काम नसल्याने त्यांनी तो २४ लाख रुपयांना शिर्डी येथील सरोदे बंधूंना गेल्या वर्षी विकला होता. या व्यवहारात महेर यांचे डम्परवरील बँकेचे थकीत कर्जाचे उर्वरित हप्ते भरण्याची तयारी सरोदे बंधूंनी दर्शवली होती. महेर यांचा डम्पर सरोदे बंधू घेऊन गेले होते. बँकेचे चार हप्ते भरल्यानंतर सरोदे यांनी डम्परवरील उर्वरित हप्ते वेळेत भरण्यास टाळाटाळ सुरू केली. बँकेतून महेर यांना थकित रकमेबाबत विचारणा होऊ लागली. महेर सरोदे यांना हप्ते भरण्यास सांगू लागले. ते त्यास दाद देत नव्हते. बँकेकडून सतत होणाऱ्या विचारणेमुळे महेर यांनी सरोदे यांना हप्ते भरणार नसला तर मी डम्पर परत ताब्यात घेतो असे सांगितले.

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…
A drunken boy who beat his parents at Rethere Budruk in Karad taluka was killed by his father
आई वडिलांना मारहाण करणाऱ्या मद्यपी मुलाचा वडिलांकडून खून; कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील घटना
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

हेही वाचा >>> ठाणे : लाचेप्रकरणी जलसंधारण अधिकारी ताब्यात

गुरुवारी सकाळी महेर, मुलगा विकास, त्यांचा चालक मयूरेश गट्टे शिर्डी येथे सरोदे बंधूंच्या घरी गेले. त्यांनी स्वताजवळ असलेल्या चावीचा वापर करुन सरोदे बंधूंच्या ताब्यातील डम्पर डोंबिवलीत आपल्या घरी आणला. हा विषय सरोदे बंधूंना समजताच त्यांनी गुरुवारी संध्याकाळी महेर यांना संपर्क करुन तुम्हाला पैसे देतो सांगितले होते तरी तुम्ही डम्पर का घेऊन गेले अशी विचारणा करुन तुम्ही जर डम्परचा ताबा दिला नाही तर तमच्या मुलाला उचलून घेऊन तरी जाऊ किंवा डोंबिवलीत येऊन तुम्हाला गोळ्या घालून ठार मारू, अशी धमकी दिली. डम्परचे पैसे दिल्याशिवाय मी डम्पर देणार नाही, अशी भूमिका महेर यांनी घेतली. सरोदे बंधूंकडून जीवाला धोका निर्माण झाल्याने महेर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सरोदे बंधूंविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या अटकेच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.