भिवंडीत रुग्णालयातून दोन दिवसांचे अर्भक पळवले

विशेष म्हणजे यावेळी रूग्णालयातील सी.सी.टी.व्ही. यंत्रणाही बंद होती.

भिवंडी येथील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयातून शुक्रवारी सकाळी दोन दिवसांची मुलगी पळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे यावेळी रूग्णालयातील सी.सी.टी.व्ही. यंत्रणाही बंद होती.
भिवंडी तालुक्यातील राहणाल येथील शबाना शेख या उपजिल्हा रुग्णालयात ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दाखल झाल्या. मध्यरात्रीनंतर या महिलेने मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्यांना जनरल वार्डात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी एका बुरखेधारी महिलेने शबानाला परिचरिकेने बोलाविले असल्याचे सांगितले. त्या परत आल्या तेव्हा आपली तान्ही मुलगी नसल्याचे आढळून आले. त्यानंतर शबाना या धक्कय़ाने बेशुद्ध पडली
शांतीनगर पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती कळविली. त्यांनी घटनाक्रमाची माहिती घेतली. तेव्हा ठिकाणची सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बंद असल्याचे आढळून आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two day old infant theft

ताज्या बातम्या