चुलीचा धूर घरात आल्याने महिला आणि तिच्या पतीने दोन जणांवर कोयता आणि चाकूने हल्ला केल्याचा प्रकार भिवंडी येथील अंजूरफाटा भागात शनिवारी उघडकीस आला आहे. लालचंद्र पाटील आणि त्यांचा पुतण्या विघ्नेश अशी जखमींची नावे आहे. तर या हल्ल्याप्रकरणी बेबी लसणे (४०) आणि बाळाराम लसणे (४५) यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजूरफाटा येथील भरोडी गाव भागात लालचंद्र हे त्यांच्या कुटुंबियांसह  राहतात. त्यांच्या शेजारी बेबी लसणे हे त्यांचे पती बाळाराम आणि मुलासह राहतात.

शनिवारी दुपारी लालचंद्र यांच्या पत्नी रेणुका या त्यांच्या अंगणातील चुलीवर भाकरी करत होत्या. त्यावेळेस चुलीमधून मोठ्याप्रमाणात धूर झाला. हा धूर शेजारी राहणाऱ्या बेबी यांच्या घरात गेल्याने त्या शिवीगाळ करू लागल्या. याचा जाब विचारण्यासाठी रेणुका गेल्या. वाद वाढल्याने त्यांनीही शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर बेबी यांनी रेणुकाला हाताने मारहाण सुरू करत घरातून  कोयता आणला. त्याचवेळी लालचंद्र हे रेणुका यांच्या बचावासाठी आले. हा कोयत्याचा वार लालचंद्र यांच्या बोटावर झाला. त्यानंतर लालचंद्र यांचा पुतण्या विघ्नेश हा त्यांच्या बचावासाठी आला असता बेबी यांचे पती बाळाराम हे घरातून चॉपर घेऊन आले. त्यांनी चाॅपरने विघ्नेश यांच्या डोक्यावर आणि कानावर हल्ला केला. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेणुका यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल