बदलापूर: बारवी नदीच्या प्रवाहात बुडून बदलापुरातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिद्धेश संदेश सावंत (१८) आणि बाळकृष्ण अशोक केदारे (३६) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी मित्रांसमवेत हे दोघे बारवी नदीत पोहण्यासाठी गेले होते. सिद्धेश सावंत हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला बाळकृष्ण केदारेही बुडाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढून बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले.

Story img Loader