गेल्या चार दिवसापूर्वी भोपर गावात एका घराला आग लागून घरातील आई, दोन मुली या गंभीररित्या भाजल्या होत्या. रविवारी मुलींच्या आईचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी नऊ वाजता १२ मिनिटांच्या अंतराने दोन्ही मुलींनी प्राण सोडले. एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने डोंबिवलीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> ठाणे : बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्यांना अटक ; काॅलसेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणुक

समीरा पाटील (१४), समीक्षा पाटील (११) अशी मरण पावलेल्या बहिणींची नावे आहेत. त्या ९१ टक्के भाजल्या होत्या. या मुलींची आई प्रीती ही ९१ टक्के भाजली होती. प्रीतीच्या भावाने या मृत्यूला प्रीतीचा पती प्रसाद पाटील हाच जबाबदार असल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.प्रीती, समीरा, समीक्षा यांच्यावर डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. डाॅक्टरांनी अथक प्रयत्न करुन या तिघींवर उपचार सुरू ठेवले होते. भाजण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे डाॅक्टरांनी सांगितले.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांचे झिंगाट गाण्यावर नृत्य ; नगरविकास प्रधान सचिवांकडे तक्रार

प्रसादचे अन्य एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याने तो प्रीती आणि तिच्या मुलींना अनेक वर्षापासून त्रास देत होता. तिचा शारीरिक, मानसिक छळ करत होता. कोणत्या तरी पदार्थाचा वापर करुन प्रसाद पाटील याने पत्नी, त्याच्या दोन्ही मुलींना पहाटेच्या वेळेत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तिघी ९१ टक्के भाजल्या, असे प्रीतीच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे. प्रीतीचे माहेर पेण तालुक्यातील होते.प्रसादकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रीतीने यापूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द तक्रार केल्या होत्या.