कल्याण रेल्वे स्थानकात एका अपंग महिलेची पिशवी चोरुन त्यामधील दीड लाखाचा सोन्याचा ऐवज आणि रोख रक्कम लुटून वाराणसी एक्सप्रेसने पळून गेलेल्या दोन चोरट्यांना रेल्वे सुरक्षा बळाचे विशेष पथक आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी भुसावळ स्थानकात कौशल्याने अटक केली. रविवारी ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ठाणे; मलेशियात नोकरी लावण्याचे अमीष दाखवून चार जणांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

विजयकुमार बनारसीलाल निषाद , पूनम अशोक भारव्दाज अशी आरोपींची नावे आहेत. एक अपंग महिला रविवारी कल्याण रेल्वे स्थानकातून प्रवासासाठी आली होती. ही महिला अपंग होती. तिच्यावर पाळत ठेऊन आरोपी विजयकुमार, पूनम यांनी ही महिला एका जागी बसताच, तिच्या आजुबाजुला कोणी नाही हे पाहून तिच्याजवळील पिशवी लंपास केली. या महिलेने ओरडा केला. परंतु, अपंग असल्याने तिला धावता आले नाही. पिशवी घेऊन चोरटे काही वेळ रेल्वे स्थानकाबाहेर गेले. त्यानंतर हे चोरटे पुन्हा कल्याण रेल्वेस्थानकात येऊन वाराणसी एक्सप्रेसने वाराणसीच्या दिशेने पळून गेले.

हेही वाचा- ठाणे: लाच घेतल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील अधिकारी ताब्यात; गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली होते पैसे

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपंग महिलेने तक्रार केली. पोलिसांनी तातडीने स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यामध्ये दोन जण पिशवी चोरत असल्याचे आणि ते पुन्हा स्थानकात येऊन वाराणसी एक्सप्रेसने पळून गेले असल्याचे दिसले. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तातडीने भुसावळ रेल्वे स्थानकातील सुरक्षा विभागाला संपर्क केला. कल्याण रेल्वे स्थानकात चोरी केलेले दोन चोरटे वाराणसी एक्सप्रेसने भुसावळ दिशेने येत असल्याची माहिती दिली. भुसावळ पोलिसांनी वाराणसी एक्सप्रेस येताच आरोपी असलेल्या डब्यात प्रवेश केला. पोलिसांना पाहून आरोपींची भंबेरी उडाली. पोलिसांनी डब्यातच त्यांना अटक केली. त्यांच्या जवळून चोरीची पिशवी ताब्यात घेतली. कल्याण स्थानकात चोरी केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.

हेही वाचा- ठाणे : घोडबंदर भागात १०० किलो गांजा जप्त

भुसावळ पोलिसांनी दोन्ही आरोपींचा ताबा कल्याण पोलिसांच्या ताब्यात दिला. कल्याण सुरक्षा जवान पथकाचे प्रसाद चौगुले, भुसावळ सुरक्षा पथकाचे दीपक कालवे यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली. या दोन्ही आरोपींनी यापूर्वी किती चोऱ्या केल्या आहेत. त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two thieves arrested for stealing jewelery and money from a disabled womans bag at kalyan railway station dpj
First published on: 05-12-2022 at 21:28 IST