लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील रामनगर पोलीस ठाण्यात घरगुती विषय मार्गी लावण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये मंगळवारी संध्याकाळी रामनगर पोलीस ठाण्यात मारमारी झाली. एक महिलेने दुसऱ्या महिलेच्या केसाच्या झिंज्या उपटल्या. एक महिलेने आरडाओरडा करून पोलीस ठाणे डोक्यावर घेतले. त्यामुळे महिला हवालदारांनी या महिलेवर सौम्य बळाचा वापर करून तिला शांत केले.

pune female officer is main accused in MPSC exam question papers leak case
एमपीएससी घोटाळा ; आरोपींमागे मुख्य सूत्रधार महिला अधिकारी ?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
woman from Buldhana missing after Prayagraj stampede has been found in Varanasi
कुंभमेळ्यात बेपत्ता महिला सापडली, वाराणसी रेल्वे पोलिसांची मदत; पालकमंत्र्यांनीही…
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…
In Khadakpada area of ​​Kalyan West transgender beaten woman and her little daughter for 20000
कल्याणमधील खडकपाडा येथे तृतीय पंथीयांकडून महिलेला मारहाण
pune after womans murder at bpo police issued an sop for womens safety in it companies
‘आयटी’ कंपनीतील महिलांच्या सुरक्षेसाठी नियमावली, नियमावलीचे पालन करणे बंधनकारक; पोलिसांकडून वेळोवेळी तपासणी
2 women marry each other
नवऱ्याचा छळ आणि व्यसनाधीनतेला कंटाळून, दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक

पोलिस ठाण्यात येऊन अंमलदार कक्षात आरडाओरडा करून शांततेचा भंग केल्याबद्दल पोलिसांनी ललित जैन (४५, रा. अंधेरी), चंदा ललित जैन (३७, रा. अंधेरी) यांच्यावर हवालदार ज्ञानेश्वर शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात ललित जैन यांना अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा-एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे ऐवज चोरणारा चोरटा भिवंडी रेल्वे स्थानकातून अटक

हवालदार शिंदे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील माहिती अशी, की ललित आणि चंदा जैन हे पती, पत्नी अंधेरी येथे राहतात. मंगळवारी जैन दाम्पत्य डोंबिवलीत राजाजी पथावर एका सोसायटीत राहत असलेल्या रेखा जैन यांच्याकडे आले होते. रेखा आणि चंदा या दोन्ही बहिणी आहेत. या दोन्ही बहिणींचे वडील रेखा जैन यांच्या डोंबिवलीतील घरी राहतात. चंदा या आपल्या वडिलांना अंधेरी येथील आपल्या घरी नेण्यासाठी प्रयत्नशील होत्या. यावरून रेखा, चंदा या दोन बहिणींमध्ये वाद सुरू होता.

हा वाद सुरू झाल्याने या दोघींचे वडील हिरालाल कोठारी हे आपल्या दोन्ही मुली, जावई, नात यांच्यासह रामनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी आले. तेथे त्यांनी पोलिसांना मी अंधेरी येथे चंदा जैन यांच्या घरी जाण्यास तयार नाही असे सांगितले. कोठारी यांनी अंधेरी येथे येण्यास नकार देताच चंदा, ललित जैन यांना राग आला. त्यांनी पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षात मोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घातला. या गोंधळात रागाच्या भरात चंदा जैन यांनी बहिण रेखा हिच्या १६ वर्षाच्या मुलीचे केस जोराने ओढले. यावेळी रेखा यांच्या मुलीनेही चंदा हिचे केस जोराने ओढून त्यांच्यात झटापट झाली. कोणत्याही परिस्थितीत चंदा आणि ललित जैन ऐकण्यास तयार नव्हते. चंदा यांचे आकांडतांडव सुरू होते. अखेर पोलीस ठाण्यातील महिला हवालदारांनी सौम्य बळाचा वापर करून चंदा यांना शांत केले.

आणखी वाचा-कोल्ड प्ले निमित्त महामुंबईत सज्जतेची आखणी; कार्यक्रमासाठी नवी मुंबईत येणारा दहा हजारहून अधिक वाहने

पोलीस ठाण्यात आरडाओरडा करून शांततेचा भंग केला. एका महिलेने दुसऱ्या महिलेचे केस पकडून मारामारी करण्याचा प्रयत्न पोलीस ठाण्यात केला म्हणून हवालदार शिंदे यांनी चंदा, ललित जैन यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक घुटुगडे तपास करत आहेत.

Story img Loader