scorecardresearch

महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले – भास्कर जाधव

जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहीहंडी महोत्सवाला आमदार जाधव यांनी हजेरी लावली.

महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले – भास्कर जाधव
आमदार भास्कर जाधव (संग्रहित छायाचित्र)

ठाणे: दोन वर्ष कोरोनामुळे आपण हा उत्सव साजरा करू शकलो नाही. करोना काळात उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते अनेक प्रकारचे टीका झाली. आरोप झाले, अडचण निर्माण करण्यात आल्या मात्र उद्धव ठाकरे कुठेही विचारलेत नव्हता त्यांनी महाराष्ट्राला करोना संकटातून बाहेर काढले गुढीपाडवा शिमगा आणि आज आपण गोकुळाष्टमीचा सण धुमधडाक्यात साजरा करीत आहोत त्याचे कारण उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व गुण हेच मान्य करावे लागेल. असे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव म्हणाले.

जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहीहंडी महोत्सवाला आमदार जाधव यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते म्हणाले की, दिघे यांचे खरे शिष्य राजन विचारे आहेत. पुढे बोलताना, श्रीकृष्ण समजून घेणे हे खूप कठीण आहे, ज्यांच्याकडे अफाट असे साम्राज्य होते परंतु आपला मित्र सुदामाच्या मैत्रीला जागला असा श्रीकृष्ण. अशा आनंद दिघे यांच्या नगरीत आपण उभे आहोत . आनंद दिघे यांचे स्वप्न ,विचार, खरी निष्ठा, खरा प्रामाणिकपणा जर पुढे घेऊन जायचा निर्णय कोणी करत असेल तर राजन विचारे आहेत असे ही जाधव म्हणाले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या