उल्हासनगर : ‘आज जो गद्दारी करतो तू मुख्यमंत्री बनतो, राजकारणाची आजची व्याख्या बदलली आहे’ असे गंभीर वक्तव्य उल्हासनगरच्या भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केले. या वक्तव्यावरून उल्हासनगरात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला असून भाजप उमेदवाराचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार कुमार आयलानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रविवारी महायुतीच्या मेळाव्यापूर्वीच शिवसैनिकांनी प्रदीप रामचंदानी यांना जाब विचारल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. शिवसैनिकांनी मेळाव्यावर बहिष्कार टाकला. जोपर्यंत भाजपचे वरिष्ठ याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत आम्ही प्रचार करणार नाही, अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

एकीकडे महायुती इच्छुकांनी बंडोबांना थंड करण्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नाकी नऊ आले असताना उल्हासनगरात मात्र भाजपच्या एका बोलघेवड्या पदाधिकाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य करत महायुतीत तणाव वाढवला आहे. शनिवारी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ साई पक्षाने भाजपसोबत आपली आघाडी जाहीर केली. यावेळी बोलताना भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त व्यक्त केले. ‘राजकारणात जो गद्दारी करतो तो मुख्यमंत्री होतो, अशी राजकारणाची व्याख्या सध्या बदलली आहे, असे वक्तव्य रामचंदानी यांनी केले. यावेळी जीवन इदनानी आपल्या विरुद्ध होते. मात्र ते आज आपल्या सोबत आहेत असेही रामचंदानी यावेळी म्हणाले.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “२३ नोव्हेंबरला राज्यात बॉम्ब फुटणार”, मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीला इशारा

हेही वाचा…बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा

मात्र रामचंदानी यांच्या वक्तव्यानंतर उल्हासनगर शहरातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. प्रदीप रामचंदानी यांनी आपल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांकडून केली जाते आहे. भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी रविवारी मेजर अरुण कुमार वैद्य सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शिवसैनिक सभागृहाबाहेर हजर झाले. यावेळी काही शिवसैनिकांनी तिथे उपस्थित रामचंदानी यांना आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल जाब विचारण्यास सुरुवात केली. काही मिनिटात रामचंदानी सभागृहात निघून गेले. त्यानंतर आमदार कुमार आयलानी तसेच भाजपचे इतर पदाधिकारी शिवसेना पदाधिकाऱ्यांना सभागृहात येण्याची विनंती करत होते. मात्र भाजपने आपली भूमिका जाहीर करावी, मगच आम्ही आत येऊ असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.

शिवसेनेचे पदाधिकारी अरुण आशान यांनी यावेळी बोलताना भाजपने आपल्या बैठकीत त्यांची भूमिका स्पष्ट करावी. अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना प्रचारापासून दूर ठेवावे. तरच आम्ही महायुतीचा प्रचार करू अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली. त्यामुळे उल्हासनगर महायुतीत तणाव निर्माण झाला आहे.

हेही वाचा…फुटीर आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची आक्रमक रणनीती, भिवंडी ग्रामीणमध्ये जिल्ह्यातील पहिली सभा

रामचंदानी यांची वादग्रस्त पार्श्वभूमी

उल्हासनगरतील भाजपचे वादग्रस्त नगरसेवक म्हणून प्रदीप रामचंदानी ओळखले जातात. पालिकेतून फाईल लपवून नेणे. वादग्रस्त वक्तव्य करणे असे प्रकार यापूर्वी रामचंदानी यांनी केली होते. अशाच वादग्रस्त वक्तव्यांमुळे काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर पालिके बाहेर हल्लाही झाला होता.

Story img Loader