scorecardresearch

Premium

उल्हासनगर महापालिकेची सीड बॉल मोहिम वृक्षारोपणासाठी सेंद्रीय खतांचा वापर करून अडीच हजार बीजगोळे तयार

नैसर्गिक पद्धतीने झाडांची बीजे निसर्गात पसरून झाडे येण्याची संख्या कमी झालेली आहे.

ulhasnagar municipal corporation's Seed Ball Campaign 2500 prepared organic fertilizers tree plantation
उल्हासनगर महापालिकेची सीड बॉल मोहिम वृक्षारोपणासाठी सेंद्रीय खतांचा वापर करून अडीच हजार बीजगोळे तयार (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगरः जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेने वृक्षारोपणाच्या मोहिमेसाठी २ हजार ५०० विविध प्रजातींचे बीजगोळे तयार केले आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेच्या उद्यान विभाग आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरात वृक्ष लागवडीसाठी सीड बॉल्स अर्थात बीजगोळे ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

real estate agents, agricultural lands in uran, farmers in uran, agents forcing farmers to sell land in uran
उरणच्या शेतजमिनीवर दलालांचा डोळा, शिवडी-न्हावाशेवा पूल, नव्या रेल्वेमुळे जमीन विक्रीला जोर
terrace garden cultivation field beans kitchen garden
गच्चीवरची बाग: पापडीची लागवड
Healthier Pawan Dodella, gondiya
गोंदिया: नवेगावबांध जलाशयातील आरोग्यवर्धक पवन डोडेला ग्राहकांची पसंती; मासेमार बांधवांना लाभ
panvel municipal corporation
पनवेल: पर्यावरण रक्षणासाठी रात्रपाळीत दिडशे पालिका कर्मचा-यांचे काम

नैसर्गिक पद्धतीने झाडांची बीजे निसर्गात पसरून झाडे येण्याची संख्या कमी झालेली आहे. यावर उपाय म्हणून बीजगोळे म्हणजेच सीड बॉल्स तयार करून कृत्रिम पद्धतीने निसर्गात झाडांची संख्या वाढवण्याचा उपक्रम उल्हासनगर महापालिकेने हाती घेतला आहे. बीजगोळे निर्मितीत माती आणि सेंद्रिय खताचा समावेश करून त्यात लावावयाच्या झाडाचे बी टाकून त्याचा गोळा बनवला जातो. तो गोळा पावसाळ्यात मोकळ्या जागेत पडीक जागेत टाकून त्यापासून पावसाच्या पाण्यातून नैसर्गिक पद्धतीने झाडांची वाढ होते ही झाडे नैसर्गिक पद्धतीने वाढत असल्यामुळे झाडे टिकून राहतात.

हेही वाचा… कल्याणमधील एक हजार कुटुंबांचे जलमय परिस्थितीमुळे स्थलांतर

उल्हासनगर शहरातील मोकळ्या जागेत, नदीकिनारी टाकून त्यापासून नैसर्गिक पद्धतीने झाडे वाढण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. शुक्रवारी जनरल अरूणकुमार वैद्य सभागृहात कर्मचाऱ्यांनी बीजगोळे तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणादरम्यान अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचे महत्त्व व नागरिकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.
फोटो आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ulhasnagar municipal corporations seed ball campaign 2500 seed balls were prepared using organic fertilizers for tree plantation dvr

First published on: 28-07-2023 at 19:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×