कल्याण- स्मार्ट सिटी शहरांमध्ये समाविष्ट असलेल्या कल्याण डोंबिवली शहरातील रस्ते, खड्डे, जागोजागी पडलेला कचरा पाहून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शहरातील बकालपणा पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. या बकालपणावरुन आयुक्तांना सोमवारी खडेबोल सुनावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा <<< Maharashtra News Live : पैठणमधील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजकीय टोलेबाजी, पैसे वाटल्याच्या आरोपालाही प्रत्युत्तर; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

हेही वाचा <<< केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे स्वागत नाहीच, पण खोली देण्यास टाळाटाळ ; डोंबिवली जिमखाना व्यवस्थापनावर भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी

केंद्रीय मंत्री रविवार पासून डोंबिवली, कल्याण मधील रस्त्यांवरुन फिरत आहेत. त्यावेळी खड्ड्यांमुळे झालेली रस्त्यांची चाळण, नागरिकांना होणारा त्रास याचा अनुभव मंत्री घेत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. किसन कथोरे, आ. संजय केळकर यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह पालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयाला सोमवारी भेट दिली. यावेळी मंत्री ठाकूर यांना पालिकेकडून स्मार्ट सिटी प्रकल्पांची नेहमीची सजविलेली चित्रफित दाखविली जात होती. ही चित्रफित पाहत असताना मंत्री ठाकूर यांनी आपल्या शहरातील एकूण परिस्थिती पाहता आपल्या शहराचा स्मार्ट सिटी शहरात समावेश आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटले. स्मार्ट सिटी शहरांची संकल्पना किती सुंदर आहे. किती आखीव रेखीव नियोजन त्यामध्ये आहे. स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट असलेली शहरे किती आखीव रेखीव प्रकल्प राबवून सुंदर करण्यात आली आहेत. या शहरांमध्ये चांगले रस्ते, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षसंवर्धन उपक्रम राबवून शहरे देखणी करण्यावर भर देण्यात आला आहे, असे मंत्री ठाकूर यांनी आयुक्तांना सुनावले.

हेही वाचा <<< केंद्रीय मंत्री आले आणि डोंबिवलीतील फेरीवाले गायब झाले

३१ जूनपूर्वी खड्डे बुजविण्याची कामे पालिकेने जुलै उजाडला तरी सुरू केली नाहीत. जुलैपर्यंत खड्ड्यांची निवीदा काढण्यात शहर अभियंता विभाग मग्शुल होता. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर रस्त्यांची दुर्दशा झाली. तोपर्यंत रस्त्यांची चाळण झाली होती. खड्डेमय रस्त्यांचा अनुभव अडीच महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीतील नागरिक घेत आहेत. केंद्रीय मंत्र्यांनाही कल्याण डोंबिवलीतील खराब रस्त्यांचा अनुभव आल्याने आता तरी पालिकेने रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरणाची कामे सुरू करावीत अशी मागणी नागरिकांनी समाज माध्यमातून सुरू केली आहे. पालिका प्रशासनाचा कारभार पूर्ण ढेपाळला असताना त्यावर कोणीही लोकप्रतिनिधी आवाज करत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister anurag thakur commissioner stupidity kalyan dombivli smart city cities ysh
First published on: 12-09-2022 at 21:06 IST