ठाणे – पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ठाणे महापालिकेच्यावतीने उत्सव वसुंधरेचा सोहळा आयोजित केला आहे. शहराती नागरिक, विद्यार्थी, गृहसंकुलांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी या उत्सवात प्रदर्शन, कार्यशाळा, स्पर्धा आणि परिसंवादांची पर्वणी असणार आहे. पर्यावरणाविषयी जागृती करणारा हा उपक्रम गुरूवार, ५ जूनपासून रविवार, ८ जून पासून ठाण्यातील गाव देवी मैदानात असणार आहे.

पर्यावरणाविषयी जनजागृती सोबतच घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन, पर्यावरणपूरक जीवनशैली यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय नागरिकांना माहिती व्हावेत, यासाठी या उत्सवाचे आयोजन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. ‘शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन अशी या उत्सवाची मुळ संकल्पना आहे. यामध्ये पर्यावरण संवर्धन प्रदर्शनात पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकला पर्यायी वस्तू, सौर ऊर्जा, मलनि:सारण प्रकल्प, हवा सर्वेक्षण उपकरणे या संदर्भातील दालने असणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवार, ५ जून रोजी होणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जिंगलचे प्रसारण देखिल करण्यात येईल. महापालिकेच्या वतीने वर्षभर पर्यावरण संदर्भात विविध स्पर्धा राबवल्या होत्या. या स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या गृहसंकुलांना या उत्सवात पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे.

या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार, ६ जून रोजी कचऱ्यातून कला आणु शाडू मातीपासून मुर्ती घडविणे या दोन कार्यशाळा होणार आहे. यावेळी ऋषिकेश पानकर आणि आदित्य हिंदलकर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ ही परिसंवाद होणार असून यामध्ये लता मेनन (शाडू मातीचा पूनर्वापर), रोहित जोशी (पर्यावरणपूरक गणेशोत्सव), दिलीप काकवीपुरे (जैवविविधता आणि आपण), अपर्णा कुलकर्णी (पर्यावरण शाश्वततेचे भारतीय प्रारुप), प्राचिन्मय (शाश्वत पर्यावरण आणि शाश्वत सेवार) यांचा सहभाग असणार आहे.तर, शनिवार, ०७ जून रोजी तीन कार्यशाळा असणार आहेत. यात ‘कबाड बॅण्ड’ या विषयावर श्रीपाद भालेराव, ‘कुंडीत रोपे लावणे’ पौर्णिमा शिरगावकर, ‘कागदी पिशव्या बनवणे’ या विषयावर प्रिया कणसे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘घरगुती कचरा व्यवस्थापन’ या परिसंवादात सुरभी ठोसर (आपल्या कचऱ्याचे आपण व्यवस्थापक), सुनिलीमा (पर्यावरणपूरक घरगुती स्वच्छता संसाधने), लता घनश्यामानी (सॅनिटरी वेस्ट व्यवस्थापन) आपले मत मांडणार आहेत.

या कार्यक्रमाची सांगता रविवार, ८ जून रोजी होणार असून ‘शाश्वत पर्यावरण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात संदीप अध्यापक (शाश्वत इमारत व्यवस्थापन), प्रदीप घैसास (निसर्गावर आधारित पर्याय), शरद पुस्तके (ऊर्जा व्यवस्थापन) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, सुरेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नैसर्गिक रंग प्रशिक्षण’ कार्यशाळा होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन २०२५’ ०५ ते ०८ जून या दिवसात सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खुले असणार आहे. तर, कार्यशाळा आणि परिसंवाद हे कार्यक्रम दुपारी तीननंतर सुरू होणार आहे.