ठाण्यात घरोघरी लसीकरण सुरू

ठाणे शहरातील शंभर टक्के करोना लसीकरण पूर्ण होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून घरोघरी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ठाणे : महापालिकेच्या करोना लसीकरण केंद्रे आणि शिबिरांकडे नागरिकांनी पाठ फिरविल्यामुळे पालिकेने मंगळवारपासून घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये लस घेतलेली नसलेल्या नागरिकांना लशीचे महत्त्व पटवून देत त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. या उपक्रमास नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ठाणे शहरातील शंभर टक्के करोना लसीकरण पूर्ण होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून घरोघरी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील ५ लाख ३५ हजार नागरिकांनी अद्यापही लशीची एकही मात्रा घेतलेली नाही. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि घोडबंदर भागात शिक्षक आणि आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामध्ये लस घेतलेली नसलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे. या माहितीच्या आधारे पालिका आरोग्य विभागाचे पथक संबंधित नागरिकांना भेटून त्यांना लशीचे महत्त्व पटवून देत त्यांचे लसीकरण करत आहे. या उपक्रमासाठी स्थानिक नगरसेवकांची मदत घेण्यात येत आहे. या मोहिमेसाठी १६७ जणांचे पथक नेमण्यात आले असून या पथकाच्या संख्येत आणखी वाढ करण्यासाठी तयारी पालिकेने सुरू केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vaccination started at home in thane municipal corona virus infection vaccination center akp

ताज्या बातम्या