scorecardresearch

डोंबिवलीतील वैशालीताई जोंधळे महाविद्यालयात महिलांना पदवीची संधी

येत्या शैक्षणिक वर्षापासून बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचरल ऑफ काॅमर्स, बी. सी. ए., एल. एल. बी., बी. एम. एस. हे अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू केले जाणार आहेत.

डोंबिवलीतील वैशालीताई जोंधळे महाविद्यालयात महिलांना पदवीची संधी
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानका जवळील जोंधळे विद्या संकुलातील वैशालीताई जोंधळे वरिष्ठ महाविद्यालयात मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) महिला विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विविध शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. डोंबिवली, कल्याण परिसरातील पदवीधर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांनी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन, महाविद्यालयाच्या विश्वस्त वैशालीताई जोंधळे यांनी केले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून वृध्द हॉटेल मालक, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

येत्या शैक्षणिक वर्षापासून बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचरल ऑफ काॅमर्स, बी. सी. ए., एल. एल. बी., बी. एम. एस. हे अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वयाची अट नाही. स्थानिक पातळीवर महिलांना पदवीधर होण्याची होण्याची संधी मिळाल्याने पदवी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाधिक महिलांनी प्रवेशासाठी पुढे यावे, असे वैशालीताई जोंधळे यांनी सांगितले.

प्रवेशासाठी इच्छुक महिलांनी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळील जोंधळे विद्या संकुलातील वैशालीताई जोंधळे महाविद्यालयातील कार्यालयात संपर्क साधावा. किंवा ८७६७४०३३३३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 13:54 IST

संबंधित बातम्या