टिटवाळा येथील बल्याणी भागात दोन अज्ञात तरुणांनी एका औषधविक्री करणाऱ्या दुकानदाराला दमदाटी करत दुकानाच्या गल्ल्यातील बारा हजार रुपये चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून टिटवाळा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बल्याणी येथे प्रकाश प्रजापती (३०) यांचे वेलकम मेडिकल नावाचे औषध विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रकाश प्रजापती हे दुकान बंद करत होते. त्यावेळी अचानक तिथे दोन अज्ञात व्यक्ती आल्या. त्यांनी प्रकाश यांच्याकडे पैशाची मागणी केली. प्रकाश यांनी त्यांना नकार देऊन तिथून जाण्यास सांगितले. प्रकाश पैसे देत नसल्याचा राग आल्याने दोघांनी रागाने दुकानाच्या दर्शनी भागात असलेली काच हाताने फोडून टाकली. दुकानासमोरील स्टूल, खुर्च्या, लाकडी बाकडा उचलून ते सामान दुकानाच्या दिशेने फेकले. त्यामुळे औषधे ठेवलेल्या मंचाची मोडतोड झाली.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Gold Silver Price on 1 March
Gold-Silver Price on 1 March 2024: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!

त्यानंतर आरोपींनी सर्व औषधे, फुटलेल्या काचा दुकानात फेकून दिल्या. प्रजापती आणि त्यांचे कामगार आत मध्ये लपून राहिल्यामुळे थोडक्यात बचावले. फेकाफेकीत दुकानात काचांचा खच पडला होता. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला होता. या गोंधळामध्ये तरुणांनी गल्ल्यामधील बारा हजार रुपयांची रक्कम लांबवली.

या घटनेची माहिती प्रजापती यांनी तात्काळ टिटवाळा पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी हे बल्याणी परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शोधून अटक केली. सुंदरमरम राजपूत(३०), शेहजाद शेख (२५) अशी आरोपींची नावे आहेत.