Premium

द केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीतून उत्तर मिळाले; चित्रपटाचे निर्माते वपुल शहा यांची टिका

लोकशाहीमध्ये टिका करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीतून उत्तर मिळाले आहे, अशी टिका चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी केली.

The Kerala Story
चित्रपट 'द केरला स्टोरी’ ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

ठाणे : लोकशाहीमध्ये टिका करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीतून उत्तर मिळाले आहे, अशी टिका चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील कोरम माॅलमध्ये सोमवारी रात्री ठाणे जिल्हा सखल हिंदू समाज, रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाऊंडेशन यांच्यावतीने द केरला स्टोरी या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यावेळी चित्रपटाचे निर्माते विपुल शहा उपस्थित होते. आम्ही हा चित्रपट चांगल्या हेतूने तयार केला. देशात दहशतवादाचे जाळे तयार करून मुलींना फसविले जात आहे. ते आम्ही या चित्रपटातून उघड केल्याचे शहा म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 21:34 IST
Next Story
डोंबिवलीत पाणी मिश्रित भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त